तरुण भारत

बेंगळूर: खासगी रुग्णालयात २० टक्के बेड राखीव ठेवण्याचा बीबीएमपीचा निर्णय

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने बेडची मागणीही कमी होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोरोना बेडच्या मागणीचा विचार करत खासगी रुग्णालयातील बेडची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बीबीएमपीने खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील बेड्स सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यातील फक्त २० टक्के बेड राखीव ठेवणार असल्याचे म्हंटले आहे.

बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील तब्बल१३ हजार बेड सरकारी कोट्यात ठेवण्यात आले आहेत. ते म्हणाले, आम्ही साधारण २० टक्के बेड राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर उर्वरित बेड त्यांना परत देण्याचे ठरविले आहे.

सरकार आणि महापालिका एकत्रितपणे येत्या काही दिवसांत उच्च अवलंबित्व युनिट (एचडीयू), आयसीयू, आयसीयू-व्हेंटीलेटर (आयसीयू-व्ही) बेडवर निर्णय घेतील, असेही गुप्ता म्हणाले.

Advertisements

Related Stories

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री कारजोळ कोरोनाबाधित

Shankar_P

मुख्यमंत्री येडियुरप्पांनी मंत्र्यांकडून घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

Shankar_P

कर्नाटकः एसएसएलसी पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

triratna

कोरोनाची दुसरी लाट आल्यास कर्नाटक सज्ज

Shankar_P

बेंगळूर: प्रश्नपत्रिका फुटल्याने बी.कॉमची परीक्षा पुढे ढकलली

triratna

संजनाच्या आरोग्याबाबत सीबीआयचे अधिकारी तुरुंग अधिकाऱ्यांशी संवाद साधणार

Shankar_P
error: Content is protected !!