तरुण भारत

शहापूर कंडी प्रकल्प नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या सीमेवर बांधण्यात येत असलेला शहापूर कंडी प्रकल्प नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय प्रदेशात रावी नदीच्या संपूर्ण पाण्याचा वापर करणे हा यामागचा उद्देश आहे, ज्यामुळे कठुआ जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर जम्मू विभागातील कंडी बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमी सिंचित क्षेत्राला कंडी म्हणून ओळखले जाणार नाही. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Advertisements

डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की, रावी नदीचे पाणी सध्या माधोपूर हेडवर्क्समार्गे पाकिस्तानात जाते. हा धरण प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंजाबमधील 5000 हेक्टर आणि जम्मू-काश्मीरमधील 32,173 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. 

तसेच जेव्हा-जेव्हा सीमेपलीकडून गोळीबार होईल किंवा पाकिस्तानशी संबंध ताणले जातील, तेव्हा या भागातील अनेक नेते ताबडतोब पाकिस्तानात जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्याबद्दल बोलतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात हा मुद्दा येताच त्यांनी या प्रकल्पाच्या तातडीने पुनरुज्जीवनासाठी वैयक्तिक हस्तक्षेप केला, असेही ते म्हणाले.

Related Stories

आमदारांवरील आरोप मागे घ्यावेत!

Omkar B

‘लस उत्सवा’वर राहुल गांधींची टीका

Amit Kulkarni

कोरोना : दिल्लीत मागील 24 तासात 3,231 नव्या रुग्णांची नोंद ; 233 मृत्यू

pradnya p

उत्तराखंडमधील बेपत्तांचा आकडा ‘दोनशे’पार

Patil_p

आग्रा : आठवड्यातील 2 दिवसीय लॉकडाऊनचे नियम आता अधिक कडक

pradnya p

हरयाणात 30 जून पर्यंत च्युईंगम विक्रीवर बंदी 

prashant_c
error: Content is protected !!