तरुण भारत

लग्नाच्या परवानगीसाठीची संख्या घटली

गत महिन्यात 2230 तर मागील दहा दिवसांत 97 जणांनी घेतली परवानगी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. दरम्यान, कोणतेही कार्यक्रम करण्यासाठी शासनाची परवानगी बंधनकारक आहे. मागील दहा दिवसांत लग्नकार्यासाठी केवळ 97 जणांनी तहसीलदार कार्यालयातून परवानगी घेतली आहे. त्यामुळे लग्नासाठी परवानगी घेणाऱयांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. गत महिन्यात तब्बल 2230 जणांनी तहसीलदार कार्यालयातून रितसर परवानगी घेऊन लग्नकार्य केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून लग्न व धार्मिक कार्यांवर मर्यादा आल्या आहेत. शासनाने लग्न व धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक केली आहे. दरम्यान, लग्नकार्यासाठी 40 जणांनाच उपस्थितीची परवानगी दिली आहे. शिवाय लग्नकार्य सकाळी 10 च्या आत उरकण्याचा नवीन नियमही जारी केला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करत लग्न करावे लागत आहे.

साधारण एप्रिल व मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त अधिक असतात. त्यामुळे या महिन्यात लग्ने अधिक होतात. मात्र, दोन वर्षांपासून लग्नकार्यात कोरोनाचा अडसर आला आहे. त्यामुळे धुमधडाक्मयात लग्नकार्य करणाऱयांचा हिरमोड झाला आहे. काहींनी कोरोना संधी मानून साधेपणात लग्नकार्य उरकून घेतले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक बचतही झालेली पाहायला मिळत आहे.

कार्यक्रमांतील गर्दी टाळण्यासाठी शासनाने धार्मिक कार्यांसह इतर सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. दरम्यान, लग्नाबरोबर धार्मिक कार्यक्रम, गृहप्रवेश व इतर कार्यक्रम करायचे असल्यास परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही अटींवर परवानगी दिली जात आहे. तालुक्मयातील नागरिकांना तहसीलदार कार्यालयात परवानगी देण्याची व्यवस्था केली आहे.

मागील महिन्यात दररोज 40 हून अधिक परवानगीचे अर्ज येत होते. ती संख्या आता दररोज 10 ते 15 वर आली आहे. लॉकडाऊन काळात यादी पे शादी करणाऱयांची संख्या वाढली असून पारंपरिक पद्धतीने लग्न करणाऱयांची संख्या घटली आहे. संबंधितांना केवळ घरासमोर लग्न करण्यास परवानगी असून मंदिर, मंगल कार्यालय, हॉटेल व इतर ठिकाणी लग्न करण्यास बंदी आहे.

Related Stories

निम्मे भाडे भरल्यासच टाळे खोलू

Patil_p

तिसरे गेट उड्डाणपुलाच्या बिमचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

Patil_p

‘त्या’ दगावलेल्या जनावरांना गंभीर आजार

Amit Kulkarni

आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रा साधेपणाने करा

Patil_p

दुचाकीची पिकअप वाहनास धडक : 2 ठार

Patil_p

शेतकरी-कामगारांसाठी चळवळ हाती घेणे गरजेचे

Patil_p
error: Content is protected !!