तरुण भारत

दादागिरी करून पैसे उकळणारा पोलीस गजाआड

व्यापाऱयांनीच दिले पकडून : पैसे, कपडे करत होता गोळा : एफआयआर दाखल

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लॉकडाऊनची भीती दाखवत व्यापाऱयांवर दादागिरी करून पैसे, कपडे व इतर साहित्य गोळा करणाऱया राज्य राखीव दलाच्या एका पोलिसाला अटक करण्यात आली आहे. व्यापाऱयांनीच त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले असून गुरुवारी रात्री त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

सिद्धारुढ रामाण्णा वड्डर (वय 39) असे त्याचे नाव आहे. तो राज्य राखीव दलाच्या दुसऱया बटालियनमध्ये सेवा बजावतो. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून आपल्या मोटारसायकलवरून तो खडेबाजार, गणपत गल्ली परिसरात फिरत होता. भाजी विपेत्यांवर दमदाटी करून भाजी गोळा करत होता.

लॉकडाऊनच्या काळात सकाळी 6 ते 10 पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यासाठी मुभा आहे. 10 नंतरही दुकाने सुरू असलेली बघून सिद्धारुढ त्या दुकानात घुसायचा. आपण क्राईम ब्रँचचा पोलीस आहे. वेळ संपल्यावरही तुम्ही दुकान सुरू ठेवले आहे, तुमच्यावर कारवाई का करू नये, अशी दमदाटी करायचा.

पोलिसाच्या दमदाटीमुळे दुकानदार नरमला की त्या दुकानातील कपडे व इतर साहित्य मागून घ्यायचे. एखादे हॉटेल उघडे दिसले की तेथे जाऊन दमदाटी करून नाश्ता मागून घ्यायचा. गुरुवारी त्याच्या दादागिरीला कंटाळून व्यापारी व नागरिकांनी त्याला पकडून सकाळी खडेबाजार पोलीस स्थानकात आणले. हद्दीच्या आधारावरून त्याला मार्केट पोलिसांकडे सोपविण्यात आले.

त्याच्यावर भा.दं.वि. 384, 448 कलमान्वये एफआयआर दाखल करून अटक करण्यात आली आहे. रात्री प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. मार्केटचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांनी ही कारवाई केली आहे. राज्य राखीव दलाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अलोककुमार यांच्या निदर्शनासही ही गोष्ट आणून देण्यात आली आहे.

Related Stories

गांजा विकताना आंध्र मधील दोघा जणांना अटक

Rohan_P

तरुण भारतच्या वृत्ताची हेस्कॉमकडून दखल

Amit Kulkarni

खानापूर : मास्क-सामाजिक अंतर-लसीकरणावर भर द्या

Amit Kulkarni

नक्षत्र कॉलनी येथे 25 लाखाची घरफोडी

Patil_p

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Patil_p

नवे शैक्षणिक धोरण क्रांती घडविणारे; डॉ. चेतन सिंगाई

Patil_p
error: Content is protected !!