तरुण भारत

गुरुवारी कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

जिल्हय़ात 539 नवे रुग्ण, 12 जण दगावले

 प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

गुरुवारी बेळगाव जिल्हय़ातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. 539 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 420 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  बेळगाव तालुक्मयातील 194 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 72 हजार 256 इतकी झाली आहे तर आतापर्यंत 63 हजार 474 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 8 हजार 107 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध इस्पितळ व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यापैकी अधिकाधिक जणांवर घरी उपचार करण्यात येत आहेत.

गेल्या 24 तासात कोरोनामुळे बारा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा मृतांचा आकडा 675 वर पोहोचला आहे. बेळगाव तालुक्मयातील तीन, चिकोडी, सौंदत्ती तालुक्मयातील प्रत्येकी दोन, अथणी, बैलहोंगल, खानापूर, गोकाक व रायबाग तालुक्मयातील प्रत्येकी एक जणाचा मृतांत समावेश आहे. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून बेळगाव जिल्हय़ात आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढविण्यात आला असून 21 जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. जिल्हा प्रशासनाने आरटीपीसीआर व रॅपिड टेस्ट वाढविली आहे. रुग्णसंख्या 5 टक्क्मयांवर उतरल्यानंतरच लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे.

गुरुवारी काकती, कंग्राळी बी.के., बाळेकुंद्री खुर्द, बेनकनहळ्ळी, हुंचेनट्टी, बोकनूर, बेळगुंदी, गणेशपूर, हिंडलगा, देवगिरी, सुळेभावी, मच्छे, मण्णिकेरी, देवगानट्टी, के. के. कोप्प, निलजी, हलगा, पिरनवाडी, राकसकोप, आंबेवाडी, सरस्वतीनगर, सुळगा, बसुर्ते, विजयनगर, टिळकवाडी, राणी चन्नम्मानगर, अंजनेयनगर, रामतीर्थनगर, कणबर्गी, बापट गल्ली परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

हुलबत्ते कॉलनी, खंजर गल्ली, कुमारस्वामी लेआऊट, लक्ष्मी टेकडी, महांतेशनगर, बसवाण गल्ली-बेळगाव, अलारवाड, अमाननगर, आनंदनगर-वडगाव, भाग्यनगर, बिम्स कॅम्पस, चव्हाट गल्ली, गाडेमार्ग-खासबाग, लक्ष्मी गल्ली-वडगाव, माळी गल्ली, मंगाईनगर-वडगाव, मारुती गल्ली-खासबाग, नेहरुनगर, बसव कॉलनी, राघवेंद्र कॉलनी, हिंदूनगर, सदाशिवनगर, संतरोहिदास कॉलनी, शाहूनगर, शिवबसवनगर, द्वारकानगर, सुभाषनगर, विनायकनगर, विजयनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार

Patil_p

शहरात मतदान जनजागृती रॅली

Patil_p

भाजीमार्केटची आयुक्तांकडून पाहणी

Patil_p

जन्म-मृत्यू विभागाच्या सर्व्हर डाऊनमुळे नागरीक ताटकळत

Patil_p

नदीकाठावरील गावांची जिल्हाधिकाऱयांनी केली पाहणी

Patil_p

बेळगावात नव्या नियमाची अंमलबजावणी

Patil_p
error: Content is protected !!