तरुण भारत

शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

मुंबई \ ऑनलाईन टीम

पश्चिम बंगाल निवडणूक रणनीतीकारप्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या बैठकीत नेमकी कोणती रणनीती ठरणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे प्रशांत किशोर यांनी बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर संन्यास घेतला आहे. त्यानंतर प्रशांत किशोर आज शरद पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात असलं तरी चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशांत किशोर यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं आहे.

Advertisements

Related Stories

प्राप्तीकरासाठी मिळणार दोन पर्याय पर्याय, पण सुविधा सोडाव्या लागणार

Patil_p

लोकजनशक्ती पक्षात बंडखोरी

Patil_p

१७२२ शेतकरी महिलांनी भरले ३ कोटींचे वीजबिल

pradnya p

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात उच्चांकी डिस्चार्ज

pradnya p

सावधान : ऑनलाइन पैसे पाठवताय .. सोशल मीडियाचे अकाऊंट होतायत हॅक

Shankar_P

शाहुवाडी : प्रत्येक वाहनाची कसून चौकशी सुरू

Shankar_P
error: Content is protected !!