तरुण भारत

एल्टन डिकॉस्ता केपेतून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार

प्रतिनिधी / मडगाव

केपे मतदारसंघातील ग्रामीण भागातील लोकांना अद्याप मूलभूत सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत. या भागातील लोक हलाकिचे जीवन जगताना दिसत आहे. या भागातील लोकांना मूलभूत सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी युवा उद्योजक तथा समाजसेवक एल्टन डिकॉस्ता यांचे प्रयत्न चालू आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या आज स्वखर्चाने सोडवण्यास भर दिलेला आहे. आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements

राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले केपेचे आमदार चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांना केपे मतदारसंघातील लोकांनी चार वेळा निवडून देऊन देखील त्यांना या मतदारसंघातील समस्या सोडवण्यात अपयश आलेले आहे. त्या सर्व समस्या सोडवण्याकरिता केपे मतदारसंघातील लोकांनी एकदा आपल्यावर विश्वास ठेवून 2022च्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी पाठींबा द्यावा असे आवाहन एल्टन डिकॉस्ता यांनी केले आहे.

दै. तरूण भारत पाशी बोलताना डिकॉस्ता म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीत मालू वेळीप यांच्या प्रचाराला फिरताना ग्रामीण भागातील परिस्थीती बघून मला खूपच दुःख वाटले. आज माझ्याकडे सर्व काही आहे. मला राजकारणात येण्याची गरज नव्हती. पण केपे मतदारसंघातील परिस्थीती सुधारण्यात यावी या उद्देशाने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. केपे मतदारसंघाचा विकास होणे गरजेचे आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे कार्य पुढे नेण्याचेही काम केलेले आहे. हल्लीच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गोवा प्रदेश काँग्रेस समीतीचे अध्यक्ष गिरिश चोडणकर यांच्या उपस्थित केपे युथ काँग्रेसची समिती निवडण्यात आलेली आहे. केपे युवा गट काँग्रेस समितीची धुरा प्रशांत वेळीप यांच्यावर सोपवलेली आहे.

केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांचे नेतृत्व केपेतील जनतेने बघितलेले आहे. त्यांच्याकडे आज सत्ता आहे तरी देखील या मतदारसंघातील युवकांना रोजगार प्राप्त झालेला नाही. केपे मतदारसंघातील युवकांनी आता जागृत होण्याची वेळ आलेली आहे. तसेच यंदाची निवडणूक केपे मतदारसंघातील जनतेने एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे. जर आपण एकत्र येऊन निवडणूक लढत नसल्यास चंद्रकांत कवळेकर हे घराणेशाही सुरु करतील. सध्या त्यांची पत्नी सावित्री कवळेकर सांगे मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. नंतर आपल्या पुत्राला देखील हळूहळू राजकारणात आणण्याची तयारी उपमुख्यमंत्री कवळेकर करतील. हे सर्व होण्याच्या आधीच आपण सतर्क होण्याची गरज असल्याचे डिकॉस्ता म्हणाले.

केपे मतदारसंघातील अनुसूचित जमातीतील लोकांनी सुद्धा एकत्र येण्याची गरज आहे. या समाजातील लोकांपर्यंत आज सरकारच्या प्रत्येक योजनांची माहिती पोहचत नाही. सरकारच्या प्रत्येक योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे होते. पण आज तसे होत नाही. या समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेतलेले आहे. तरी सुद्धा नोकरी नसल्या कारणाने त्यांना घरीच बसावे लागते. अशा युवकांना योग्य व्यासपीठ देऊन पुढे नेण्याचे काम केले जाईल. केपे मतदारसंघातील प्रत्येकाचा विकास व्हावा या दृष्टीने विचार करुन पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. केपे मतदारसंघातील जनतेने उपमुख्यमंत्री कवळेकर यांचा पराभव करणे हा एकमेव ध्येय आपल्या मनी ठेवला पाहिजे असे, समाजसेवक डिकॉस्ता यांनी पुढे बोलताना सांगितले.

Related Stories

वाद नको, ऑक्सिजन मिळणे महत्वाचे : मुख्यमंत्री

Omkar B

कोरोना निर्मूलनार्थ ईडीसीकडून 1 कोटी

Omkar B

घोडेमळ-सत्तरी, शिरेन-चिंबलही ‘कंटेनमेंट’ झोन

Omkar B

स्थलांतरित मालमत्तेतील घरमालकांना मिळाले हक्क

Patil_p

समुद्रकिनाऱ्यावर 90 जणांना जेलीफिशचा दंश

Patil_p

पालयेत खत व बियाणे वाटप

Amit Kulkarni
error: Content is protected !!