तरुण भारत

कुलभूषण यांना उच्च न्यायालयात अपील करण्यास परवानगी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याविरोधात पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे. कुलभूषण यांना त्यांच्या शिक्षेविरोधात आता उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तान संसदेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बहुमताने मान्य करण्यात आला आहे.  

Advertisements

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि एका बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते. 

त्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालय विधेयक 2020 ला मंजुरी देत दिली. त्यामुळे कुलभूषण यांना आता मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार मिळाला आहे.

Related Stories

कोरोनाचा प्रभाव : विमान कंपन्यांना 113 अब्ज डॉलरच्या नुकसानीचे संकेत

tarunbharat

जम्मू काश्मीरमध्ये 677 नवे कोरोना रुग्ण ; 7 मृत्यू

pradnya p

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर चेतन भगत म्हणाले…

prashant_c

देहरादून : जनशताब्दी ट्रेनच्या धडकेने हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू

pradnya p

चीन : 28 रुग्ण

Patil_p

उत्तरप्रदेशात दंगल भडकविण्याचा कट

Patil_p
error: Content is protected !!