तरुण भारत

कोरोना पूर्वी ब्लॅक फंगस आजार होता

सामाजिक कायदा ट्रस्टच्या कार्यक्रमात डॉ. जयेश राणे यांनी दिली माहिती  

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गेल्या काही दिवसात ब्लॅक फंगसचे प्रकरण खूप वाढत असून आत्तापर्यंत चार जणांचे बळी गेलेले आहेत. वास्तविक ब्लॅक फंगस हा आजार नवा नसून तो अगोदरही होता. राज्यात कोरोना येण्या अगोदरपासून श्लेष्मल त्वचा हा आजार होता श्लेष्मल त्वचा आजार म्हणजेच ब्लॅक फंगस असे डॉ. जयेश राणे यांनी सांगितले आहे. ज्यांच्यातील रोग प्रतिकार श्कती कमी होते त्यांच्यात श्लेष्मल त्वचा आजाराचे रुग्णामध्ये संधीसाधू प्रमाणे जागा मिळवतात आणि आपले काम सुरु करीत असतात. एचआयव्ही बाधीत मधुमेह वाढणाऱया रुग्णामध्ये हे किटाणू आढळून येत होते आता कोरोना बाधीत असलेल्या रुग्णांमध्येही काही प्रमाणात ब्लॅक फंगसचे किटाणू आढळून येतात असेही डॉ. जयेश यांनी सांगितले. त्यामुळे बॅल्क फंगस हा आजार अगोदर पासूनच होत. त्याचा परीणाम होऊ नये यासाठी  रोग प्रतिकार शक्ती वाढविमे हेच महत्वाचे. असेही डॉ. राणे म्हणाले.

सामाजिक कायदा ट्रस्ट या संस्थेने पर्वरी येथे बॅल्क फंगस आजारासंदर्भात माहिती देणारा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून  डॉ राणे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत ट्स्ट्रचे उपाध्याक्ष सोमनात कर्पे, सचिव वल्लभ पांगम उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ, राणे म्हणाले की कोरोना बादीत रुग्णांवर ब्लॅक फंगस आजाराचे विषाणू हमला करतात व रुग्णांच्या रक्त प्रवाहावर परिणाम करतात व रोग प्रतीकार शक्ती कमी करतात. नंतर शरिरातील मृत पेशीवर ताबा मिळवतात. सुरुवातील त्याचा संसर्ग नाक व आजूबाजूच्या भागात होतो. रक्त येणे, क्रस्टींग होणे ही ब्लॅक फंगसची प्राथमिक लक्षणे आहेत. वेळीच उपाय न केल्यास नंतर डोळे व डोक्यावर परिणाम करतात त्यात रुग्ण दृष्टीहिन होऊ शकतात, नंतर दात दुखणे, त्वाचेवर काळे डाग पडणे यासारखे परिणाम ज्या रुग्णांला मधुमेहचा आजार असून त्याच्यात ब्लॅक फंगसच्या विषाणूने प्रवेश केला आहे. असेही डॉ, राणे म्हणाले. अशा रुग्णांनी वेळीच उपाय योजना करणे गरजेचे असते. ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटणे हेच योग्य.

 ट्स्ट्रचे उपाध्याक्ष सोमनात कर्पे यांनी डॉ राणे यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचे स्वगत केले. सामाजिक कायदा ट्रस्ट या संस्था एक सामाजीक कार्य म्हणून लोकांना वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम करीत आहे. या कार्यात राज्यातील काही डॅक्टरांनीही त्यांना सहकार्य केले आहे. त्यात डॉ. कन्नया सिरसाट, अमय स्वार वेदीका वाळके, सोनीया काणेकर,  केवल शिरोडकर निधी प्रभू यांचा समावेश आहे. ज्यांना वैद्यकीय सेवेची आवशकता आहे त्यांनी 7249855831 किंवा 9960820710 या क्रमांकावर संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे.  सामाजिक कायदा ट्रस्ट कार्यालय म्हापसा कदंबा बसस्थानका समोर ब्रागांझा बिल्डींग दुसरा मजला येथे आहे.

Related Stories

राज्यात 15 दिवस सक्तीचे लॉकडाऊन करा : संजय बर्डे

Omkar B

गोवा ही सुवर्णभूमी बनविण्यासाठी सरकार कार्यरत- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Patil_p

नोटबंदी फायद्यापेक्षा नुकसानच जास्त

Patil_p

विधानसभा निवडणुकीसाठी आपची मोर्चेबांधणी सुरू

GAURESH SATTARKAR

करचुकव्या 77 उद्योगांची बँक खाती गोठवली

Patil_p

कोरोनाने वास्कोत पसरले पाय

Omkar B
error: Content is protected !!