तरुण भारत

पुणेकरांना मोठा दिलासा; सर्व दुकानं, मॉल्स सोमवारपासून रात्री 7 वाजेपर्यंत खुली राहणार

पुणे \ ऑनलाईन टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील मुभा देण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती. रुग्ण संख्येची परिस्थिती बघून आणखी शिथिलता देणार की निर्बंध कठोर केले जाणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागलं होतं.

पुण्यात मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी येतात. अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास मुभा देण्यात आल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisements

Related Stories

सुशील कुमारला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून १ लाखांचं बक्षीस जाहीर

triratna

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

pradnya p

महू धरणात बालकाचा पोहताना मृत्यू

Patil_p

राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट

Shankar_P

खर्च कमी करण्यासाठी पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पाचव्यांदा झाले बाबा!

pradnya p
error: Content is protected !!