तरुण भारत

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ऑनलाईन टीम / मुंबई : 


ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज डिस्चार्ज देण्यात आला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना 6 जून रोजी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर डिस्चार्जसंबंधी माहिती देण्यात आली.

Advertisements


सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे. तब्येतीबाबत आता काळजी करण्यासारखे काही नाही. दिलीप साहब यांच्यासाठी तुमच्या सदिच्छा, तुमची प्रार्थना कायम राहू दे, असे दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दुपारी सांगितले. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी सायरा बानो यांची विनंती’गेल्या काही दिवसांपासून माझे प्रिय पती युसुफ खान यांची प्रकृती ठीक नसून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. माझे पती, माझे कोहिनूर, दिलीप कुमार साहब यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल अशी माहिती मला डॉक्टरांनी दिली आहे. कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका अशी मी तुम्हाला विनंती करते’, असे त्यांनी लिहिले होते.

Related Stories

रजनीकांतच्या फिल्म सेटवरील 7 जणांना कोरोनाचा संसर्ग

pradnya p

‘जंगजौहर’ चित्रपटाची पहिली झलक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

datta jadhav

विवादानंतर कंगनाला उपरती; कंगना म्हणाली…

pradnya p

ऍक्शनपट ‘मुंबई सागा’चा टीझर प्रदर्शित

Patil_p

प्लॅनेट मराठी करणार सहा नव्या चित्रपटांची निर्मिती

Patil_p

भावार्थ माऊली अल्बममधून घुमले मंगेशकरांचे सूर…

Patil_p
error: Content is protected !!