तरुण भारत

अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यावर वाई वनविभागाची कारवाई

सातारा / प्रतिनिधी : 

आसले, ता. वाई येथे अवैध लाकूड वाहतूक प्रकरणी वाई वनविभागाने जीवन वसंतराव मोरे (रा.पाचवड, ता. वाई) याच्यावर गुन्हा दाखल करून लाकूड हस्तगत केले आहे.

Advertisements

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि.8 रोजी वाई वन परीक्षेत्राचे वनपाल भुईज, वनरक्षक बेलमाची, भुईज, बोपेगाव यांनी आसले येथे रस्त्यावर तपासणी केली असता ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.11जी 4532 हा लाकूड वाहतूक करताना आढळून आल्याने तो ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी जीवन मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनरक्षक सचिन डोंबळे, वाई वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश झांजुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईजचे वनपाल संग्राम मोरे, वन रक्षक रजिया शेख, संजय गाडे, लष्मण देशमुख, वनकर्मचारी लालसिंग पवार यांनी केली.

Related Stories

सातारा : खंबाटकी घाटात आढळला अर्धवट जळालेला युवतीचा मृतदेह

triratna

सातारा : शिक्षकांच्या शाळेमुळे बदली प्रक्रिया लांबली

Shankar_P

सातारा : वनगळ येथील शेतीचे नुकसान थांबवा

triratna

सातारा जिल्ह्यात 589 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 16 नागरिकांचा मृत्यू

triratna

कल्याणी शाळेनजीक कोरोनाबाधित युवकाची आत्महत्या

datta jadhav

निलेश फाळके यांची राज्यमंत्री यड्रावकर यांचे विशेष कार्य अधिकारीपदी नियुक्ती

datta jadhav
error: Content is protected !!