तरुण भारत

हिमाचल प्रदेश : माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / शिमला : 


हिमाचल प्रदेशमध्ये 6 वेळा मुख्यमंत्री झालेले वीरभद्र सिंह यांना पुन्हा एकदा म्हणजेच दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी सकाळी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मागील काही दिवसांपासून ते आयजीएमसी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर देखरेख करणारी एक नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी वीरभद्र सिंह यांना 12 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काल रात्री त्यांचे नमुने घेतले असता आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 


86 वर्षीय वीरभद्र सिंह यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांचे समर्थक चिंतेत असून त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करीत आहेत. 

  • वीरभद्र सिंह यांनी घेतला आहे पहिला डोस 


3 जून रोजी वीरभद्र सिंह यांनी आपल्या पत्नीसह शिमलामधील डीडीयू रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा लागण झाली असल्याने चिंता वाढली आहे. डॉक्टरांच्या मते दोन महिन्याच्या आत एकाच व्यक्तीला दोनदा लागण होणे ही दुर्लभ बाब आहे.  

Related Stories

राज ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पत्र; म्हणाले…

pradnya p

‘कृषी’विषयक विधेयकांचा विरोधकांकडून अपप्रचार

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 875 रुग्णांवर उपचार सुरू 

pradnya p

उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार पार

pradnya p

चंदीगडमध्ये फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट

Patil_p

विनामूल्य लसीबाबत राज्यांनी निर्णय घ्यावा!

Patil_p
error: Content is protected !!