तरुण भारत

जिह्यात चाचण्यांसह रूग्णसंख्येचाही विक्रम

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये प्रशासनाने कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला आह़े शुक्रवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात 4 हजार 269 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये तब्बल 693 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आह़े चाचण्यांची संख्या वाढल्याने रूग्णसंख्याही वाढली आह़े तसेच मागील 24 तासात 28 मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Advertisements

  मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करून जास्तीत-जास्त रूग्णांना उपचारात व त्यांचे विलगीकरण करणे अत्यावश्यक असत़े मात्र सुरूवातीपासूनच आरोग्य विभागाने कमी चाचण्यांवर भर दिल्याने रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्य़ा शासनाच्या नियमानुसार प्रत्येक रूग्णामागे 20 जणांच्या कारोना चाचण्या करणे आवश्यक आह़े त्यानुसार 693 रूग्णांचा विचार करता दिवसाला 14 हजार चाचण्या होणे गरजेचे आह़े जिल्हा प्रशासनाकडून पॉ†िझटिव्हीटी रेट कमी करण्यासाठी चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आह़े कोरोना चाचण्या वाढवणे, हे रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी शस्त्र असल्याचा विसर प्रशासनाला पडला आह़े  जून महिन्याचे 10 दिवस उलटून गेल्यानंतर आता चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत़

  शुक्रवारी जिल्हा रूग्णालयाकडून करण्यात आलेल्या 4 हजार 269 टेस्टपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 471 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 222 असे एकूण 693 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े तर तब्बल 28 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये सरकारी रूग्णालयामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून खासगी रूग्णालयामध्ये 16 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े  यामुळे जिह्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 473 झाली आह़े तर मागील 24 तासामध्ये कोरोनापासून बरे झालेल्या 865 जणांना घरी सोडण्यात आल़े यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या आता 36 हजार 985 इतकी आह़े  शुक्रवार सायंकाळपर्यंत जिह्यात 4 हजार 494 रूग्ण उपचारात दाखल असल्याचे सांगण्यात आल़े  जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 86.10 इतके आहे तर जिह्याचा मृत्यूदर हा 3.42 इतका असून पॉझिटिव्हीटी रेट 17.61 आह़े

Related Stories

दापोलीत तीन दिवस ‘ड्राय डे’

Patil_p

जिल्ह्य़ात 8 मे पर्यंत कोरोना लसीकरण सत्रे

Amit Kulkarni

मोजक्याच वाळू व्यावसायिकांवर वक्रदृष्टी का?

Patil_p

गुहागरातही कोटय़वधीची व्हेलची उलटी जप्त

Patil_p

सावंतवाडीत ज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्ड उपलब्ध

NIKHIL_N

35 हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!