तरुण भारत

उत्तराखंडात मागील 24 तासात 287 नवे कोरोना रुग्ण; 21 मृत्यू

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात काही प्रमाणात रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या संख्येत किंचित घट पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात 287 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला. तर कालच्या 1 हजार 614 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

Advertisements


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 26,476 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 93 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 06, हरिद्वारमध्ये 44, नैनिताल 07, उत्तरकाशीमध्ये 8, पौडीमध्ये 9, टिहरी 13, अल्मोडा 13, रुद्रप्रयाग 5, चमोली 11, चंपावत 26, पिथोरागडमध्येे 37 आणि बागेश्वर जिल्ह्यात 15 रुग्ण आढळून आले आहेत.


प्रदेशात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 61 हजार 153 इतकी झाली आहे. यातील 3 लाख 15 हजार 235 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.67 % इतके आहे. तर सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली असून 5,227 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 6,909 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे ‘हे’ विशेष ‘१२७’ अतिथी लावणार उपस्थिती

Abhijeet Shinde

कोरोनाने दिवसभरात 300 हून अधिक मृत

Patil_p

पँगाँग सरोवराजवळ भारताने तैनात केले मरीन कमांडो

datta jadhav

बेंगळूरमध्ये वाढदिवस कार्यक्रमात स्फोट

Patil_p

लॉकडाऊन उठविल्यास सामाजिक संक्रमणाचा धोका

Patil_p

विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून

Patil_p
error: Content is protected !!