तरुण भारत

प्रतापगड : लोकांनी बनवले कोरोना माता मंदिर ; प्रशासनाने मंदिर हटविले

  • पोलीस ठाण्यात जमा केली मूर्ती


ऑनलाईन टीम / प्रतापगड : 


उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात कोरोना मातेचे मंदिर बनवले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, प्रशासनाने हे मंदिर हटविले असून पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून घटनेची तपासणी सुरु केली आहे.

Advertisements

 
मिळालेल्या माहितीनुसार, शुकुलपूर जुही या गावात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि दहशत सुरू झाली. दरम्यान, गावातील लोकेश श्रीवास्तव या इसमाने 7 जून रोजी कोरोना मातेचे मंदिर बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने एक मूर्ती ऑर्डर केली आणि गावातील एका चौथऱ्याजवळील लिंबाच्या झाडाच्या बाजूला स्थापन केली. 


लोकांनी अंधश्रद्धा बाढवा देत या देवीची पूजा आरती सुरू केली. याची माहिती पोलिसांना कळल्यावर लोकेश श्रीवास्तव घाबरला. ही बाब अंधश्रद्धेशी जोडली असल्याने हे मंदिर पडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर सांगीपुर पोलिसांनी शुक्रवारी रात्री जेसीबीने मंदिर हटविले. 


दरम्यान, आरोपीच्या एका भावाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. मंदिर जमीनदोस्त करण्यात आल्याने गावात चर्चांना उधाण आले आहे.  

Related Stories

राफेलचे आगमन अवघ्या 36 तासांवर

Patil_p

कल्याण-डोंबिवलीच्या ‘त्या’ निर्णयास तुर्तास स्थगिती

Rohan_P

लडाख : चिनी सैनिक 2 किमी मागे हटले

datta jadhav

कोरोना संसर्ग एप्रिलच्या मध्यावधीत शिखरस्थानी

datta jadhav

‘काँग्रेसला स्वबळावर लढायचंय तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात?’

triratna

महिला दिन : राज ठाकरेंनी महिलांना दिला ‘हा’ संदेश

Rohan_P
error: Content is protected !!