तरुण भारत

सांगली : कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी कडक धोरण राबवा : पालकमंत्री पाटील

प्रतिनिधी / इस्लामपूर

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण पॉझिटीव्हीटीचा दर 10 टक्क्यांपर्यंत खाली आला असताना वाळवा तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्हीटीचा दर 13 टक्के आहे. वाळवा तालुक्याचा पॉझिटीव्हीचा दर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, मोकाटपणे फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करावी, पोलीसांनी गस्त वाढवावी, असे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

Advertisements

गटविकास अधिकारी, वाळवा यांच्यावतीने व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे वाळवा तालुका कोरोना सद्यस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, वाळव्याचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक एन. एस. देशमुख, आष्टाचे पोलीस निरीक्षक बी. आर. निंभोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, विविध ग्रामपंचयातींचे सरपंच यावेळी सहभागी झाले होते. पालकमंत्री पाटील यांनी कामेरी, येडे निपाणी, पेठ, बागणी, नेर्ले, वाटेगाव, मालेवाडी, कासेगाव, रेठरेधरण, भडकंबे, वाळवा, शिरगाव, साखराळे, गोटखिंडी, बावची, ऐतवडे खुर्द व बुद्रूक, येलूर, चिकुर्डे, तांबवे, कुरळप, कार्वे, नवेखेड या गावच्या सरपंचांशी संवाद साधला .

Related Stories

आटपाडीत बर्ड फ्लू नियंत्रण समिती स्थापन – प्रांताधिकारी

Abhijeet Shinde

सांगली : राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लवकरच लोकार्पण करणार – महापौर दिग्विजय सूर्यवंशी

Abhijeet Shinde

सागंली : कुपवाड परिसरात उद्याने विकसित करण्यासाठी राष्ट्रवादीचे पाऊल

Abhijeet Shinde

डॉक्टरचा श्वानावर अघोरी उपचार, श्वानाचे दोन्ही कान मुळातूनच कापले

Abhijeet Shinde

सांगली : कर्नाटकातून आलेली दारु महाराष्ट्रात पकडली

Abhijeet Shinde

सांगली : कुस्ती मैदानाची परंपरा बलवडीकरांनी राखली अबाधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!