तरुण भारत

माजोर्डा येथे सहकाऱयाकडून सहकाऱयाचा खून

प्रतिनिधी/ मडगाव

एका किरकोळ वादातून माजोर्डा येथे शुक्रवारी रात्री उशिरा खून झाला. एका सहकाऱयाने आपल्या सहकाऱयाचाच खून केला.

Advertisements

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक राकेश कुमार यानी दिलेल्या माहितीनुसार मयत आणि आरोपी दोघेही पश्चिम बंगालातील असून मयताचे नाव सुफल रविंद्रनाथ शर्मा (29) तर आरोपीचे नाव सुभाणकर जना (22) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुभाणकर जना आणि मयत सुफल शर्मा हे दोघे सुतार म्हणून माजोर्डा येथील एका फर्निचर तयार करणाऱया लहान कारखान्यात काम करीत होते.

शुक्रवारी सायंकाळी एका किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद झाले आणि दोघेही हमरीतुमरीवर आले. करता करता वाद चिघळला आणि आरोपीने एक लाकडी दंडुका मयताच्या तोंडावर हाणला. इतकेच नव्हे तर जवळच असलेल्या एका धारदार शस्त्राने आरोपीने मयताच्या छातीवर वार केले.

या हल्ल्यामुळे सुफल स्शर्मा गंभीररित्या जखमी झाला. रक्ताच्या थारोळय़ात जखमी व्यक्ती पडलेली असताना ही खबर कोणीतरी कोलवा पोलिसांच्या कानी घातली आणि कोलवा पोलीस माजोर्डा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले तेव्हा तेथे एक व्यक्ती जखमी स्थितीत पडलेली असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी या जखमी व्यक्तिला मडगावच्या सरकारी इस्पितळात नेले. त्याच्यावर उपचार चालू असताना त्याला मृत्यू आला.

जखमी मृत झाल्याचे पाहताच कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर व त्यांच्या सहकाऱयांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि अमर गावकर, संजय गावकर, अक्षय नाईक व वडार या पोलीस कर्मचाऱयांनी आरोपीला पकडले.

मूळ पश्चिम बंगालमधील या आरोपीविरुद्ध खून केल्याच्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखीन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Stories

झुआरीनगर चौपदरी महामार्गावर भीषण अपघात

Amit Kulkarni

दिव्यांग ज्येष्ठ दांपत्याला न्याय देण्यास सरकारी यंत्रणा बनल्या मुकबधिर

Patil_p

पोलीस कॉन्स्टेबल संदेश भगत यांचे अपघाती निधन

Amit Kulkarni

विदेशातील गोमंतकीय खलाशांची परिस्थिती एकदम बिकट

Omkar B

देवभूमी अंत्रुज नगरीत आजपासून देवीचा जागर

Amit Kulkarni

अटकेतील युवकाला जामिनावर सोडण्याचा आदेश

Omkar B
error: Content is protected !!