तरुण भारत

अनेक गुन्हय़ांचा छडा, पाणावल्या डोळय़ांच्या कडा

पोलीस दलातील रॅम्बो श्वानाचा मृत्यू, बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

वेगवेगळय़ा गुन्हय़ांच्या तपासात पोलीस दलाला मदत करणाऱया रॅम्बो या श्वानाचा शनिवारी मृत्यू झाला. रॅम्बोच्या जाण्याने पोलीस दल हळहळले. शनिवारी अखेरची सलामी देऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रॅम्बोला अखेरची मानवंदना देताना त्याच्या प्रशिक्षकासह उपस्थित पोलिसांचे डोळे पाणावले होते.

रॅम्बोचा जन्म 2 ऑक्टोबर 2009 चा. जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाची प्रशिक्षणासाठी निवड झाली. 25 मे 2010 ते 5 एप्रिल 2011 पर्यंत बेंगळूर येथील पोलीस दलाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात त्याला प्रशिक्षित करण्यात आले. गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात आजवर त्याची मोठी मदत झाली.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, सी. ए. आर. विभागाचे डीसीपी सिद्दनगौडा पाटील यांच्यासह अनेक वरि÷ अधिकाऱयांनी रॅम्बोच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अखेरचा सलाम केला. पोलीस मैदानावर त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची सलामी देण्यात आली. त्यानंतर पोलीस जिमखाना आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

रॅम्बोने आजवर अनेक गुन्हय़ांचा छडा लावण्यास पोलीस अधिकाऱयांना मदत केली आहे. तीन वर्षांपूर्वी कुवेम्पुनगर येथे झालेल्या तिहेरी खून प्रकरणाचा तपास करण्यात रॅम्बोचाही वाटा मोठा होता. एपीएमसी, टिळकवाडी, माळमारुती, कॅम्प, मारिहाळ, उद्यमबाग, काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या चोऱया, घरफोडय़ांचा तपास करण्यातही रॅम्बोने अधिकाऱयांना मदत केली होती.

2016-17 व 2017-18 मध्ये झालेल्या विभागीय पातळीवरील पोलीस क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन सलग दोन वर्षे रॅम्बोने दुसरा क्रमांक मिळविला होता. राज्य पातळीवरील कार्यक्रमातही रॅम्बोने भाग घेतला होता. पोलीस दलात गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासासाठी म्हणून स्वतंत्र श्वान असतो. तर स्फोटकांच्या तपासासाठी दुसरे श्वान कार्यरत असतात. रॅम्बोला गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

Related Stories

गोकाक ग्लॅडिएटर्सचा सलग चौथा विजय, एजे स्पोर्ट्स विजयी

Patil_p

बायपास विरोधात पुन्हा एल्गार

Amit Kulkarni

राज्य सरकारकडून येडियुरप्पा स्किल कनेक्ट जॉब पोर्टल लॉन्च

Abhijeet Shinde

आरपीडी पीयू कॉलेज ऑफ आर्ट्स ऍन्ड कॉमर्समध्ये नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत

Amit Kulkarni

मंथनतर्फे उद्या 33 वे महिला साहित्य संमेलन

Patil_p

कर्नाटक : 1.70 कोटी रुपयांची लाच प्रकरणी बीडीए अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल

Sumit Tambekar
error: Content is protected !!