तरुण भारत

साताऱयात विकेंडला ‘शटर डाऊन’

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पहिलाच विकेंड लॉकडाऊन असल्याने अनेक सातारकरांनी घरात न बसता बाहेर पडणे पसंत केले. परंतु घराबाहेर पडणे त्यांच्या चांगलच अंगलट आले. विनाकारण बाहेर फिरणाऱयांची कोरोना टेस्ट करण्यात येत होती. शहरात 160 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यात 4 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. शहरात ठिकठिकाणी पोलीस विनाकारण फिरणाऱयांची कसून चौकशी करत होते. पाच दिवसाच्या अनलॉकनंतर विकेंड लॉकडाऊन निमित्ताने सातारकरांना घरबंद व्हायला लागले.

Advertisements

दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर सातारा जिल्हाधिकाऱयांनी अनलॉक केले आहे. आठवडय़ाच्या शेवटच्या दोन दिवसाकरता विकेंड लॉकडाऊन ठेवले गेले आहे. त्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी पुन्हा दुकानांची शटर डाऊन दिसत होती. परंतु शहरातील रस्ते सकाळी वाहतुकीने गजबजले होते. परंतु ठिकठिकाणी होत असलेल्या कारवायाची खबर लागताच शहर पुन्हा सामसूम झाले. जे चुकून बाहेर आले त्यांना पोलिसांच्या कारवाईंला सामोरे जावे लागले. सातारा शहरातल्या एन्ट्री पॉईंटवर लॉकडाऊन काळात जसा बंदोबस्त दिसत होता तसाच बंदोबस्त होता. यामध्ये पोवईनाका, मोळाचा ओढा, वाढे फाटा, शाहु चौक, कमानी हौद, मोती चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक आदी ठिकाणी बंदोबस्त होता. प्रत्येक बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचाऱयांकडून बाहेर आलेल्यांची चौकशी केली जात होती. ते बाहेर कशाकरता आलेत याची माहिती घेवुन त्यांना विचारणा केली जात होती.

विनाकारण फिरणाऱयांची अँटीजेन टेस्ट

शहरात विनाकारण फिरणाऱयांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत होती. त्यामध्ये बॉम्बे रेस्टाँरंट चौकात दोन जण तर करंजे नाका येथे दोन जण असे चार आरोग्य विभागातील कर्मचारी विनाकरण बाहेर फिरणाऱयांची तपासणी करत होते. त्यात करंजे नाका येथे 100 जणांचे स्वॅब घेतले. त्यामध्ये 3 जण कोरोना बाधित आढळून आले. तर बाँम्बे रेस्टॉरंट येथे 60 जणांची तपासणी केली त्यात एक जण बाधित आढळून आला. तर कमानी हौद येथे प्रत्येकाची अडवून विचारपूस केली जात होती. त्यामुळे तेथेही काही सातारकरांना वाटले की कोरोना टेस्ट केली जात आहे की काय? यामुळे अनेकांनी रस्ताच बदलून अन्य रस्त्याने प्रवास केल्याचे चित्र दिसत होते. 

Related Stories

“खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?”

Abhijeet Shinde

आता घरबसल्या ‘ऑन लाईन’ ट्रेडींग

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 29 मे 2020

Patil_p

दापोलीतील पिसई आरोग्य केंद्रात दिली गेली संशयास्पद लस

Abhijeet Shinde

शिरोळ पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद – जिल्हा पोलीस प्रमुख

Abhijeet Shinde

आता तालुका पातळीवरही खासगी इस्पितळात उपचार

Rohan_P
error: Content is protected !!