तरुण भारत

एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोहिमेचा कराडला प्रारंभ

वार्ताहर/ कराड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पत्र पाठवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे यांच्या हस्ते कराडला या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

Advertisements

यावेळी कराड दक्षिणचे उपाध्यक्ष सागर देसाई, सूरज जाधव, विक्रम नलवडे, रोहित कांबळे, उमेश वाटेगावकर, महेश गायकवाड, विक्रम सातपुते, अथर्व साळुंखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातून एक कोटी पत्र पाठवण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यभरातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंतप्रधानांना पत्र पाठवत आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सचिव निखिल शिंदे यांच्या हस्ते शनिवारी टपालपेटीत पत्र टाकत कराडला या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कराड व विद्यानगरला पहिल्याच दिवशी साडेआठशे पत्र पाठवण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. कराड व पाटण तालुक्यातून जास्तीत जास्त पत्र पाठवण्यासाठी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

Related Stories

माईक बंद करुन आवाज दाबला

Patil_p

सावर्डे पाटणकरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

Abhijeet Shinde

शहीद संदीप सावंत अनंतात विलीन

Patil_p

‘स्पुतनिक-व्ही’चा 20 दिवसांपासून तुटवडा

datta jadhav

कोरोना कहर : महाराष्ट्रात 61,695 नवे बाधित; 349 मृत्यू

Rohan_P

हातकलंगले तालुक्यात ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्त्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!