तरुण भारत

कोल्हापूर : 1586 नवे कोरोना रुग्ण, तर 33 मृत्यू

कोरोनामुक्तांमध्ये वाढ, सक्रीय रूग्णांत घट

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी, गेल्या 24 तासात कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 586 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 571 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 551 झाली आहे. कोरोना मृत्यू कमी झाले असून सक्रीय रूग्णसंख्येतही घट झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 168 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 202, नगरपालिका क्षेत्रात 634, शहरात 835 तर अन्य 497 आहेत. मृतांमध्ये जिल्ह्यांतील 31 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 571 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 16 हजार 591 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 586 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 61, भुदरगड 42, चंदगड 44, गडहिंग्लज 52, गगनबावडा 10, हातकणंगले 176, कागल 57, करवीर 280, पन्हाळा 130, राधानगरी 56, शाहूवाडी 52, शिरोळ 53, नगरपालिका क्षेत्रात 113, कोल्हापुरात 410 तर अन्य 50 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 33 हजार 310 झाली आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 3 हजार 700 अहवाल आले. त्यापैकी 3 हजार 159 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 4 हजार 33 अहवाल आले. त्यातील 3 हजार 510 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 845 रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 306 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात हजार स्वॅब रिपोर्ट आले.

सांगली जिल्ह्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी कोरोनाने तासगाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. शहरातील राजारामपुरी, दत्त कॉलनी मंगळवार पेठ, कळंबा जेल परिसर, कसबा बावडा, राजेंद्रनगर व शहरातील अन्य एक अशा 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

कोरोना रूग्ण 1586 : एकूण : 1,33,310
कोरोनामुक्त 1571 : एकूण : 1,16,591
कोरोना मृत्यू 33 : एकूण मृत्यू : 4168
सक्रीय रूग्ण : 12551

Related Stories

कोल्हापूर : वीजतारांच्या धक्क्याने सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू

Abhijeet Shinde

केआयटीच्या विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : वीज ग्राहकांनी भरले 310 कोटींचे वीज बिल

Abhijeet Shinde

वाहन चालकांनो सावधान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इचलकरंजीत बस थांबली डिव्हायडरवर

Abhijeet Shinde

पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना दरमहा नियमित धान्य मिळावे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!