तरुण भारत

गॅब्रिएला ब्रूक्ससोबत नात्यात लियाम हेम्सवर्थ

माइली साइरससोबत मागील वर्षी घटस्फोट

हॉलिवूड अभिनेता लियाम हेम्सवर्थचा मागील वर्षी अमेरिकन गायिका माइली साइरससोबत घटस्फोट झाला होता. पण लियाम आता पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आहे. मॉडेल गॅब्रिएला ब्रूक्ससोबतच्या नात्याची लियामने अधिकृत घोषणा केली आहे. हे जोडपे पहिल्यांदाच सिडनी विमानतळाच्या गोल्ड डिनर 2021 मध्ये एकत्र दिसून आले आहे. इन्स्टाग्रामद्वारे त्यांनी स्वतःच्या नात्याची कबुली दिली आहे.

Advertisements

लियामने एक छायाचित्र शेअर केले आहे. यात त्याच्यासोबत गॅब्रिएला, भाऊ क्रिस हेम्सवर्थ, त्याची पत्नी एल्सा पॅटकी आणि मॅट डॅमनची पत्नी लूसियानना बॅरोसो दिसून येत आहेत. हे सर्वजण गोल्ड डिनर 2021 मध्ये सामील झाले हेते.

लियाम आणि गॅब्रिएला यांनी मागील काही काळापासून स्वतःचे रिलेशनशिप लपवून ठेवले होते. दोघेही डिसेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसून आले होते. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे.

यापूर्वी लियाम हेम्सवर्थने सुमारे 10 वर्षांपर्यंत माइली साइरसला डेट केले होते. दोघांनी डिसेंबर 2018 मध्ये विवाह केला होता. पण त्यांचा विवाह अधिक काळ टिकू शकला नव्हता. 2020 मध्ये दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

Related Stories

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची बाधा

pradnya p

अभिनेता पर्ल वी पुरीला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

pradnya p

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

pradnya p

लॉकडाऊनमध्ये वाचन सुरु आहे : गिरीश ओक

Patil_p

होम मिनिस्टरमध्ये सन्मान माहेरवाशिणींचा

Patil_p

रोहिणी हट्टंगडींचा लॉकडाऊनचा काळ सुखाचा

triratna
error: Content is protected !!