तरुण भारत

चीनमध्ये भीषण विस्फोटात 12 जण ठार

गॅस पाइपमध्ये विस्फोट ः 138 जखमी – मृतांची संख्या वाढण्याची भीती

वृत्तसंस्था/ शियान

Advertisements

चीनमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. हुबेई प्रांतातील शियान शहरात रविवारी सकाळी गॅस पाईप फुटल्याने झालेल्या विस्फोटात किमान 12 जणांचा मृत्यू झाला तर या दुर्घटनेत 138 जण जखमी झाले आहेत. यातील 37 जण अत्यंत गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेनंतर अनेक जण ढिगाऱयाखाली अडकले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

शहरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ढिगारा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. किती जण ढिगाऱयाखाली अडकून पडले आहेत हे आताच सांगता येणार नाही. तसेच दुर्घटनेमागील कारणही स्पष्ट झालेले नसल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे. या दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या दुर्घटनेची छायाचित्रे चिनी सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत.

Related Stories

अमेरिकेत दिवसभरात 2 हजार 15 बळी

Patil_p

दिवाळी दाखविणार कोरोनावर मात करण्याचा मार्ग

Patil_p

कोरोनावरील प्रतिपिंड उपचार सर्वांना मोफत

datta jadhav

सॅनिटायजरचा वापर करावा, परंतु जपून!

Patil_p

पाकचाही चीनला दणका; ‘टिकटॉक’वर घातली बंदी

datta jadhav

चीनविरोधात अमेरिकेचे भारताला समर्थन

Patil_p
error: Content is protected !!