तरुण भारत

सिंधुदुर्ग जिल्हय़ात पाऊस दमदार

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 95 मि. मी. नोंद : करुळ, भुईबावडा घाटात दरड

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

हवामान खात्याने गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शनिवारी दमदार पावसाला प्रारंभ झाला. जिह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस कोसळला. दमदार पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग येणार आहे. मुसळधार पावसाने करुळ व भुईबावडा घाटमार्गात दरड कोसळली. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला.

दरम्यान, जिल्हय़ात गेल्या 24 तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 95 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हय़ात सरासरी 59 मि. मी. पावसाची नोंद असून आतापर्यंत एकूण सरासरी 472 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

यंदा मान्सून लवकर सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु मिरगाचा मुहूर्त चुकवत पावसाने आता जोर धरायला सुरुवात केली आहे. तौक्ते  चक्रीवादळानंतर अधुनमधून पाऊस सुरुच होता. परंतु खऱया अर्थाने आता दमदार पावसाला सुरुवात झाली आहे

कोकण किनारपट्टी भागात 10 जूनपासून अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्याप्रमाणे मुंबईत अतिवृष्टी झाली. मात्र, सिंधुदुर्गात शुक्रवारी रात्रीपासून अतिवृष्टीला सुरुवात झाली. शनिवारीही पाऊस सुरू होता. जिह्यात दमदार पाऊस सुरू झाल्याने शेतीकामानाही वेग येणार आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 44 (266), सावंतवाडी – 92 (376.5), वेंगुर्ले – 41 (207), कुडाळ – 36 (216), मालवण – 35 (322), कणकवली – 95 (345), देवगड – 54 (349), वैभववाडी – 75 (359).

करुळ, भुईबावडा घाट चार तास ‘ब्लॉक’

वैभववाडी : शनिवारी सायंकाळपासून पडणाऱया संततधार पावसामुळे करुळ व भुईबावडा घाटमार्गात दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास करुळ व भुईबावडा घाटमार्गात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच राहणार आहे. दरम्यान, वैभववाडीत दाखल झालेल्या एनडीआरएफच्या टीमने दोन्ही घाटमार्गाची पाहणी केली.

पावसाळा सुरू होताच घाटमार्गात दरड कोसळण्याचे सत्र सुरू होते. तालुक्मयात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका करुळ व भुईबावडा घाटमार्गाला बसला. संततधार पावसामुळे रविवारी सकाळी करुळ येथे, तर दुपारी भुईबावडा घाटात दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही मार्गातील वाहतुकीवर परिणाम झाला. करुळ घाटात रस्त्याच्या मध्यभागी दरड कोसळून रस्त्यावर भले मोठे दगड आले. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ही दरड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करत मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.

दरड हटविण्यासाठी ‘एनडीआरएफ’ची मदत दरम्यान, दुपारच्या सुमारास भुईबावडा घाटात दरडीचा काही भाग रस्त्यावर आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अतिवृष्टीच्या इशाऱयानंतर तालुक्मयात दाखल झालेली एनडीआरएफची टीम घाटाकडे मार्गस्थ झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले होते. सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱयांनी एनडीआरएफ टीमच्या मदतीने घाटमार्गातील दरड बाजूला करून मार्ग पूर्ववत केला. यावेळी तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कांबळे आदी उपस्थित होते.

Related Stories

संपावरील कर्मचाऱयांचे मन वळवा!

Patil_p

चिपळुणात पूर ओसरला, पावसाचा जोर कायम!

Patil_p

पशुसंवर्धनचे बजेट पोहोचले दोन कोटीवर

NIKHIL_N

पूजा राणे ‘सिंधुदुर्गनगरी सुंदरी’

NIKHIL_N

साठ लाखाच्या लूटप्रकरणी आणखी एक गजाआड

Patil_p

जिल्हय़ात कोरोना बळींची संख्या 9

Patil_p
error: Content is protected !!