तरुण भारत

संरक्षण अन् एअरोस्पेस क्षेत्रात संशोधनाला बळ

संरक्षण मंत्रालयाकडून 500 कोटींचा निधी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण आणि एअरोस्पेस सेक्टरमध्ये नव्या संशोधनाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. राजनाथ यांनी आयडेक्स (इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलेन्स)-डीआयओ (डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायजेशन) साठी आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. आयडेक्स-डीआयओचा उद्देश देशाच्या संरक्षण आणि एअरोस्पेस सेक्टरला ‘आत्मनिर्भर’ आणि ‘स्वदेशी’ करणे आहे. संरक्षण मंत्रालय पुढील 5 वर्षांमध्ये या पुढाकारासाठी 498.8 कोटी रुपये देणार आहे.

संरक्षण उत्पादन विभागाने (डीपीपी) संरक्षण नवाचार संघटनेची (डीआयओ) स्थापना केली आहे. डीआयओ आणि आयडेक्स प्रेमवर्कचा उद्देश संरक्षण आणि एअरोस्पेसमध्ये नव्या संशोधनासाठी एक इकोसिस्टीम तयार करणे आहे. याच्या माध्यमातून एमएसएमई, स्टार्टअप्स, इंडिव्हिज्युअल इनोव्हेर्स, आरअँडडी संस्था आणि शिक्षण जगतातील लोकांशी संपर्क साधण्यात येणार आहे. देशाच्या गरजेच्या दृष्टीकोनातून संबंधित कल्पना चांगली वाटलयास अनुदान/वित्तपुरवठा आणि अन्य माध्यमांद्वारे मदत केली जाणार आहे.

या योजनेतून सुमारे 300 स्टार्टअप्स/एमएसएमई/इंडिव्हिज्युअल इनोव्हेटर्स आणि इतरांना आर्थिक मदत केली जाणार आहे. यामुळे लोकांना संरक्षण क्षेत्राच्या गरजा समजणार आहेत. तर सरकारला स्वतःच्या संरक्षण गरजांसाठी नवनवे उपाय मिळत राहतील.

भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या सातत्याने संपर्कात राहणाऱया चॅनल्सची निर्मिती डीआयओ आणि त्याची टीम करणार आहे. संशोधन आणि नवोन्मेषाला बळ मिळू शकेल अशाप्रकारची कार्यसंस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे.

 भारताच्या संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्राला गरज असलेल्या नव्या, स्वदेश आणि अनोख्या तंत्रज्ञानाच्या विकासात योजना मदत करणार आहे. कमी कालावधीत या गरजा कशा पूर्ण करायच्या, याकरता नवनवे विचार समोर यावेत म्हणून इकोसिस्टीम तयार केली जाणार आहे.

सैन्याला द्यावी लागणार माहिती

आयडेक्स नेटवर्क तयार करणे आणि चालविण्यासाठी डीआयओला डीडीपीकडून निधी मिळणार आहे. नेटवर्क पार्टन इनक्युबेट्सच्या स्वरुपात असेल. याची जबाबदारी देशी कंपन्यांकडून विकसित तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे मूल्यांन करण्याची असणार आहे. त्यानंतर सैन्याच्या सर्वोच्च नेतृत्वालाही याची माहिती देत रहावी लागणार आहे. गरज्ह भासल्यास यशस्वी परीक्षण झालेल्या तंत्रज्ञानावर उत्पादनही गतिमान करावे लागणार आहे. 

Related Stories

आरोग्य तरतुदीत ऐतिहासिक वाढ

Patil_p

व्याजदर तेच : रिझर्व्ह बँकेचा निर्णय

Patil_p

केरळ माकपमध्ये ‘विजयन युग’ सुरू

Amit Kulkarni

देहरादून : क्वारंटाइन असलेल्या युवकाची आत्महत्या

pradnya p

देशाच्या शूर महिलांना रेल्वे विभागाकडून सलाम

Patil_p

लॉकडाऊनमध्ये 31 मे पर्यंत वाढ

Patil_p
error: Content is protected !!