तरुण भारत

कोरोना नियंत्रणामुळे रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ

प्रवाशांना कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन बंधनकारक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आल्याने रेल्वेच्या फेऱयांमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अनेक नवीन गाडय़ांच्या संचालनासह काही गाडय़ांची वारंवारता वाढविणे आणि काही विशेष गाडय़ांच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलांची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून ट्विटद्वारे देण्यात आली आहे. सर्व विशेष गाडय़ा पूर्णपणे राखीव असून प्रवाशांना प्रवासादरम्यान कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक असेल. 

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळय़ा भागात विशेष गाडय़ा चालवत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता त्यांच्या सोयीसाठी बांद्रा टर्मिनल, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद इत्यादी स्थानकांमधून बारौनी, समस्तीपूर, दानापूर आणि पूर्व मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांकरिता जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

Related Stories

चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान

Patil_p

डॉ. सुधाकर यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा

Omkar B

गुरुदासपूरमध्ये पाक तस्करांचा डाव उधळला; गोळीबारात जवान जखमी

datta jadhav

राफेल विमान खरेदी प्रकरण पुन्हा चर्चेत

Patil_p

दिल्ली दंगलीचा तपास हास्यास्पद

Patil_p

पाकिस्तानचा ‘नापाक’ कट व्यर्थ

Patil_p
error: Content is protected !!