तरुण भारत

दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर डावाने विजय

वृत्तसंस्था / सेंट लुसिया

दक्षिण आफ्रिकेने यजमान वेंडीजचा पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या तिसऱया दिवशी एक डाव आणि 63 धावांनी दणदणीत पराभव करत दोन सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी दिली. विंडीजच्या दुसऱया डावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने 34 धावांत 5 गडी बाद केले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेतर्फे नाबाद शतक झळकविणाऱया डी कॉकला ‘सामनावीर’चा बहुमान देण्यात आला.

Advertisements

शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी दक्षिण आफ्रिकेने उपाहारापूर्वी आपला विजय नोंदविला. या कसोटीत विंडीजचा पहिला डाव 97 धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 322 धावा जमवित 225 धावांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर विंडीजने 4 बाद 82 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. विंडीजचे शेवटचे सहा फलंदाज 80 धावांत तंबूत परतले. विंडीजच्या दुसऱया डावात चेसने एक षटकार आणि 7 चौकारांसह 62, पॉवेलने 3 चौकारांसह 14, होपने 1 चौकारांसह 12, मेयर्सने 3 चौकारांसह 12, ब्लॅकवूडने 1 चौकारांसह 13 आणि रॉशने 2 षटकारांसह नाबाद 13 धावा जमविल्या. 64 षटकांत विंडीजचा दुसरा डाव 162 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने 34 धावांत 5, नॉर्त्जेने 46 धावांत 3 आणि केशव महाराजने 23 धावांत 2 गडी बाद केले. रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा एका डावात 5 गडी बाद केले आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्त्जेने पहिल्या डावात 4 तर दुसऱया डावात 3 असे एकूण 7 बळी मिळविले. एन्गिडीने विंडीजच्या पहिल्या डावात 5 बळी मिळविले होते.

संक्षिप्त धावफलक

विंडीज प. डाव- सर्वबाद 97, दक्षिण आफ्रिका प. डाव सर्वबाद 322, विंडीज दु. डाव 64 षटकांत सर्वबाद 162 (चेस 62, पॉवेल 14, होप 12, मेयर्स 12, ब्लॅकवूड 13, रॉश नाबाद 13, रबाडा 5-34, नॉर्त्जे 3-46, केशव महाराज 2-23).

Related Stories

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

टेनिसपटूंना मिळणार आयटीएफची आर्थिक मदत

Patil_p

साईराज हुबळी टायगर्स, अलोन स्पोर्ट्स संघांचे विजय

Omkar B

मँचेस्टर युनायटेडचा विजय

Patil_p

लॉक डाऊनच्या काळात धोनी, अश्विनकडून ऑनलाईन प्रशिक्षण

prashant_c

ऑस्ट्रेलियाच्या हिलीकडून धोनीचा विक्रम मोडीत

Patil_p
error: Content is protected !!