तरुण भारत

चिलीचा सांचेझ जखमी

वृत्तसंस्था / रिओ डे जेनेरिओ

चिली फुटबॉल संघातील आघाडीफळीत खेळणारा फुटबॉलपटू ऍलेक्सिस सांचेझ याच्या पायाला दुखापत झाल्याने तो आता कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील होणाऱया प्राथमिक गटातील सामन्यात उपलब्ध होवू शकणार नाही.

Advertisements

शुक्रवारी चिली संघाचा सराव सुरू असताना सांचेझला पुन्हा या दुखापतीच्या वेदना जाणवू लागल्या. पायाच्या स्नायूना दुखापत झाल्याचे तपासणीवेळी आढळून आले. सांचेझला काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार असल्याने तो चिली संघाबरोबर ब्राझीलला प्रयाण करू शकणार नाही. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील चिलीचा सलामीचा सामना बलाढय़ अर्जेंटिनाबरोबर सोमवारी रिओ डे जेनेरिओ येथे होणार आहे. त्यानंतर चिलीचे पुढील ब गटातील सामने बोलिव्हिया, पराग्वे आणि उरूग्वे यांच्याशी होणार आहेत.

Related Stories

महिलांच्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी हंपी पात्र

Amit Kulkarni

सानिया मिर्झाचे विजयी पुनरागमन

Patil_p

कार्लसन, नाकामुरासह आठ खेळाडू बाद फेरीत

Omkar B

भारतीय संघाचे चिनी टेटे प्रशिक्षक मायदेशी रवाना

Patil_p

पहिल्या वनडेत इंग्लंडचा आयर्लंडविरुद्ध विजय

Patil_p

आयपीएल 2020 : हैदराबादला धक्का देत दिल्लीची अंतिम फेरित धडक

Shankar_P
error: Content is protected !!