तरुण भारत

इंग्लंडची प्रथमच विजयी सुरुवात

वृत्तसंस्था/ लंडन

युरो चषक स्पर्धेची विजयी सुरुवात करताना इंग्लंडने गट ड मधील सामन्यात क्रोएशियाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. नऊ प्रयत्नात पहिल्यांदाच इंग्लंडला या स्पर्धेत विजयी प्रारंभ करता आला आहे. रहीम स्टर्लिंग हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Advertisements

स्थानिक मोसमात फारशी चमक दाखवू न शकलेल्या स्टर्लिंगला संघात स्थान दिल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. पण मॅनेजर गॅरेथ साऊथगेट यांच्या या आवडत्या खेळाडूनेच आपल्या संघाला पहिल्यांदाच पहिल्या सामन्यात यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. काल्विन फिलिप्सने निर्माण करून दिलेल्या संधीवर 57 व्या मिनिटाला स्टर्लिंगने हा गोल नोंदवून वैयक्तिक गोलांचा दुष्काळ संपवला. 13 मिनिटानंतर त्याला दुसरा गोल नोंदवण्याची संधीही मिळाली होती. पण त्याचा फटका बारवरून बाहेर गेल्याने ही संधी वाया गेली. इंग्लंडने या सामन्यात जोरदार सुरुवात केली होती. पण नंतर नियंत्रण गमविले होते. मात्र पुन्हा त्यांनी नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. क्रोएशियाला मात्र आक्रमक खेळ करता आला नाही, त्यामुळे इंग्लंडचेच सामन्यावर वर्चस्व राहिले. या विजयामुळे इंग्लंडचे मनोबल मात्र उंचावले असून 1966 नंतर पहिले जेतेपद मिळविण्याच्या दिशेने त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे. या सामन्यासाठी 22500 प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती.

इंग्लंडचा पुढील सामना स्कॉटलंडविरुद्ध शुक्रवारी वेम्ब्लीवर होणार आहे तर त्याच दिवशी क्रोएशियाची लढत झेक प्रजासत्ताकविरुद्ध ग्लासगोमध्ये होणार आहे.

Related Stories

प्रीती-शिल्पाच्या संघात आज चुरस

Patil_p

मेदव्हेदेव, वावरिंका यांची विजयी सलामी

Patil_p

घरी थांबणे हाच लढण्याचा सर्वोत्तम मार्ग

Patil_p

युरो टी-20 स्लॅम पुन्हा एकदा लांबणीवर

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी फेडरर, सेरेनाचा सहभाग निश्चित

Patil_p

आजपासून आयपीएलची ‘लस’

Amit Kulkarni
error: Content is protected !!