तरुण भारत

न्यूझीलंडचा इंग्लंडवर मालिका विजय

वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम

न्यूझीलंड संघाने यजमान इंग्लंडचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 असा पराभव केला. रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडवर 8 गडय़ांनी दणदणीत विजय मिळविला. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला ‘सामनावीर’ तर देवॉन कॉनवेला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisements

या दुसऱया कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 303 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 388 धावा जमवित 85 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव 41.1 षटकांत 122 धावा आटोपला. इंग्लंडच्या दुसऱया डावात पॉपने 3 चौकारांसह 23, मार्कवूडने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 29, क्रॉलेने 2 चौकारांसह 17, स्टोनने 2 चौकारांसह 15, कर्णधार रूटने 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री आणि वॅग्नर यांनी प्रत्येकी 3 तर बोल्ट आणि पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. न्यूझीलंडला विजयासाठी 38 धावांची जरूरी होती. न्यूझीलंडने दुसऱया डावात 10.5 षटकांत 2 बाद 41 धावा जमवित विजय नोंदविला. सलामीचा लॅथम 3 चौकारांसह 23 धावावर नाबाद राहिला. कॉनवे 3 तर यंग 8 धावांवर बाद झाले. इंग्लंडतर्फे ब्रॉड आणि स्टोन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

उभय संघातील या मालिकेतील लॉर्डस् मैदानावरील पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 18 कसोटी मालिका खेळल्या गेल्या असून न्यूझीलंडने 3 मालिका जिंकल्या आहेत. यापूर्वी न्यूझीलंडने 1986 आणि 1999 साली इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका जिंकल्या होत्या. 2014 नंतर इंग्लंडला पहिल्यांदा आपल्या मायभूमीत कसोटी मालिका गमवावी लागली आहे. 2014 साली लंकेने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. न्यूझीलंडने ही कसोटी मालिका जिंकली असल्याने त्यांचा आता आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारताविरूद्धच्या अंतिम लढतीसाठी निश्चितच आत्मविश्वास वाढला आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड प. डाव- सर्वबाद 303, न्यूझीलंड प. डाव- सर्वबाद 388, इंग्लंड दु. डाव-41.1 षटकांत सर्वबाद 122 (वूड 29, पॉप 23 ,क्रॉले 17, रूट 11, स्टोन 15, हेन्री 3-36, वेग्नर 3-18, बोल्ट 2-34, पटेल 2-25). इंग्लंड दु. डाव- 10.5 षटकांत 2 बाद 41 (लेथम नाबाद 23, कॉन्वे 3, यंग 8, ब्रॉड 1-13, स्टोन 1-5).

Related Stories

इटालियन फुटबॉल हंगाम पुन्हा अडचणीत

Rohan_P

वर्ल्ड चॅम्पियन कोलमनवर दोन वर्षांची बंदी

Omkar B

लालरिनसांगा लायुची मुष्टीयुद्ध लढत 6 मार्चला

Amit Kulkarni

जपानचा जिम्नॅस्ट कोरोना बाधीत

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का; अक्षर पटेलला कोरोनाची बाधा

pradnya p

अमेरिकेतील एफ-वन शर्यती रद्द

Patil_p
error: Content is protected !!