तरुण भारत

दिल्लीतील कोरोना : मागील 24 तासात 255 नवे रुग्ण ; संसर्ग दर 0.35%

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. यासोबत दररोज वाढत असलेले मृत्यूंची संख्या देखील कमी होताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात केवळ 255 नवे रुग्ण आढळून आले असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 376 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

Advertisements


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 31 हजार 139 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 02 हजार 850 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.  सद्य स्थितीत संसर्ग दर 0.35 % इतका आहे. तर आतापर्यंत 24,823 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


सद्य स्थितीत 3 हजार 466 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 1972 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोविड केअर केंद्रात 108 जण आहेत. तर 1037 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 02 लाख 63 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 53,885 आरटीपीसीआर टेस्ट आणि 18,866 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 6,782 झोन आहेत.


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 83,286 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 54,928 जणांना पहिला डोस तर 28,358 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 60 लाख 72 हजार 572 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 46,32,178 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 14,40,394 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे. 

Related Stories

लसीकरणात ओडिशातील भुवनेश्वरचा विक्रम

Patil_p

बेंगळूर शहर-ग्रामीण जिल्हे लॉकडाऊन

Patil_p

कोरोना तांडव आणि टूलकिट

Patil_p

जामिया गोळीबार प्रकरणी आरोपीची सुरक्षित कोठडीत रवानगी

Patil_p

दिल्ली : पहिल्या 2 तासात 5.60 टक्के मतदान

prashant_c

दिल्ली : लग्नाच्या वाढदिवशी पतीने शुभेच्छा न दिल्याने पत्नीने घेतला गळफास

Rohan_P
error: Content is protected !!