तरुण भारत

उद्योजक दामोदर कोरगावकर यांचे निधन

प्रतिनिधी / मडगांव

उद्योजक तथा बोर्डा-मडगाव येथील रहिवासी दामोदर (दामूबाब) कोरगावकर (75) यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. काल रविवारी सकाळी निधन झाले. पाजीफोंड-मडगाव येथील मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशान भूमीत त्यांच्यावर काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisements

दामोदर कोरगावकर हे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात बरेच लोकप्रिय होते. त्यांच्या मृत्यू बद्दल समाजातील अनेक स्तरातील लोकांनी दुःख व्यक्त केले. एक उद्योजक म्हणून कार्यरत असतानाच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत होते. राज्यातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, स्थानिक नगरसेवक तसेच इतरांनी त्यांच्या घरी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले व श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करताना एक सहह्रदयी, इतरांना मदतीचा हात देणारा, एक चांगला माणूस गमावल्याच्या प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केल्या.

Related Stories

रविवारी तब्बल 64 नवे कोरोना रुग्ण

Omkar B

आज गणेश पूजनाने चतुर्थी उत्सवास प्रारंभ

Patil_p

सत्तरीतील कणग्या,सुरण लागवडीवर सांळीदर प्राण्याचा आघात.

Patil_p

अश्लिलताप्रकरणी पतीसह पूनम पांडे गजाआड

Patil_p

राज्यात हळूहळू लोकांची लगबग सुरु

Omkar B

मडगावच्या जुन्ता क्वॉर्टरचे निर्जंतुकीकरण कोरोनाचा रूग्ण आढळल्याने खबरदारी

Omkar B
error: Content is protected !!