तरुण भारत

काँग्रेस ओबीसी शाखा अध्यक्षपदी संदेश खोर्जुवेकर

प्रतिनिधी / पणजी

प्रदेश काँग्रेस समितीच्या ओबीसी शाखा अध्यक्षपदी संदेश खोर्जुवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हणजुणे-कायसूव पंचायतीचे सदस्य असलेले खोर्जुवेकर यांनी शिवोली गट काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

Advertisements

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मान्यतेनंतर खोर्जुवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1999 पासून ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून विविध सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर आहेत. अशी माहिती प्रदेश समितीचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी दिली आहे.

ओबीसी शाखा ही काँग्रेसची प्रमुख संघटना असून एकूण 19 समाजांसह राज्यातील सुमारे 30 टक्के लोकसंख्येचा त्यात समावेश आहे. त्यातील बहुतेक लोक हे काँग्रेसशी निगडीत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व समाजातील राजकीय व सामाजिक पुढाऱयांना काँग्रेसशी एकसंघ ठेवणे हे नवीन अध्यक्षांचे काम असणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह प्रदेश काँग्रेस समितीने खोर्जुवेकर यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले असून त्यांच्या कार्यात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Stories

साटे येथील धनगर समाजाला ना वीजेची सुविधा, ना पाण्याची

Patil_p

सत्तरी तालुक्मयातील वादळी वाऱयाचा फटका. नैसर्गिक पडझड, वाहंनाची नुकसानी,वीजयंत्रणेचे नुकसान

Omkar B

संगीत हे शाश्वत, चिरकाल आनंद देणारे !

Patil_p

निवडणुका जवळ आल्यानेच आपल्यास घरी पाठविण्याची जोसेफ सिक्वेरा यांची भाषा- मंत्री मायकल लोबो

Amit Kulkarni

जलवाहिनीसाठी खोदरलेला चर वाहनांसाठी धोकादायक

Omkar B

रमेश तवडकर दादरा-नगर हवेली, दमण-दीव एसटी मोर्चाचे प्रभारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!