तरुण भारत

गोवा सरकारकडून 100 कोटीचे कर्जरोखे विक्रीस

प्रतिनिधी / पणजी

वर्ष 2021-22 साठी भारत सरकारने राज्यांना योजनाबद्ध कर्ज घेण्यास दिलेल्या मान्यतेनुसार गोवा सरकारने 10 वर्षांच्या मुदतीसाठी 100 कोटीचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट मुंबई कार्यालयाच्या (पीडीओ) माध्यमातून लिलावाद्वारे या सरकारी स्टॉकची विक्री करण्यात येणार आहे. दि. 15 जून 2021 रोजी लिलाव होणार असून त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात बोली सादर करता येणार आहे.

Advertisements

स्पर्धात्मक प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत सादर करावे लागतील. गैरस्पर्धात्मक प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सकाळी 10.30 ते 11.00 या वेळेत सादर करावे लागतील. लिलावाचा निकाल रिझर्व्ह बँकेकडून त्याच दिवशी त्यांच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येईल.

यशस्वी बोलीदारांनी 16 जून 2021 रोजी बँकेचे कामकाज संपण्यापूर्वी रोख, बँकर्स चेक, पे ऑर्डर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट मुंबई येथे देय असलेल्या डिमांड ड्राफ्ट द्वारे पैसे भरावे. या कर्जाची परतफेड दि. 16 जून 2031 रोजी सममुल्याने करण्यात येणार आहे. या लिलावात वैयक्तिक तसेच संस्था पातळीवरही गैरस्पर्धात्मक प्रस्तावाद्वारे भाग घेता येणार आहे. त्याद्वारे निर्धारित मुल्याच्या जास्तीत जास्त 10 टक्के समभाग खरेदी करता येणार आहेत.

Related Stories

उसगांव अपघातात दोन, नावेलीत एक ठार

Omkar B

उद्यापासून राज्यात येणार चार हजार प्रवासी

tarunbharat

मांगोरहिल परिस्थिती नियंत्रणात

Patil_p

सरासरीनुसार कोरोना रुग्ण, मृतांचे प्रमाण कमीच

Omkar B

बार्से येथे कंटेनरला पाठीमागून धडक, दोन्ही वाहनांची हानी

Patil_p

लोहिया मैदान सौंदर्यीकरण रखडले राज्यपालांकडूनही संताप व्यक्त

Omkar B
error: Content is protected !!