तरुण भारत

बेंगळूरला परत येणाऱयांना कोरोना चाचणी बंधनकारक

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू होत असल्याने बेंगळूरकडे येणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्मयता आहे, असे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा म्हणाले, बेंगळूरला परत येणाऱया नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले. बेंगळूर येथील कावेरी निवासमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

Advertisements

राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे बेंगळूर शहरात येणाऱया नागरिकांची संख्या वाढणार असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकाऱयांशी चर्चा करून कठोर नियम हाती घेण्याबाबत सूचना देणार आहे. याचबरोबर प्रत्येक जिल्हय़ांचा प्रवास हाती घेऊन कोरोनाचे व्यवस्थापन, विकास कार्याची पाहणी करणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील वास्तविक स्थिती समजण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

कर्नाटक : योगी सरकारच्या राज्यात महिला असुरक्षित : सिद्धरामय्या

Shankar_P

कर्नाटक: उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण कोविड टास्क फोर्सचे नवीन प्रमुख

Shankar_P

रविवारपासून तीन दिवस राज्यभरात मुसळधार

Amit Kulkarni

कर्नाटक पोटनिवडणूक: सीरा येथे ८२ टक्के तर आर.आर.नगरसाठी ४५ टक्के मतदान

Shankar_P

हिरव्या फटाक्यांना उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

Omkar B

माजी राज्यपाल रामाजोईस यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!