तरुण भारत

केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यातून तिघे प्रयत्नशील

लिंगायत कोटय़ातून कर्नाटकला प्रतिनिधित्व शक्य : केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची चर्चा

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची चर्चा सुरू असतानाच राज्यातील खासदार शोभा करंदलाजे, पी. सी. गद्दिगौडर आणि शिवकुमार उदासी केंदीय मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाल्यास लिंगायत कोटय़ातून शिवकुमार उदासी किंवा पी. सी. गद्दिगौडर यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर महिला कोटय़ातून खासदार शोभा करंदलाजे हय़ा केंद्रीय मंत्री होतील, अशी चर्चा आहे.

लिंगायत कोटय़ातून केंद्रीय मंत्री झालेल्या दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात लिंगायत समुदायाचे प्रतिनिधित्त्व दिसत नाही. साहजिकच मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाल्यास बागलकोट लोकसभा मतदारसंघामधून चारवेळा विजय मिळविलेल्या पी. सी. गद्दिगौडर आणि हावेरी मतदारसंघातून तीनवेळा खासदार झालेल्या शिवकुमार उदासी यांच्यापैकी एकाला केंदीय मंत्रिमंडळात समावेश करून घेण्याबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. सध्या केंद्रात राज्यातून डी. व्ही. सदानंदगौडा आणि प्रल्हाद जोशी हे कॅबिनेट मंत्री आहेत.

कर्नाटकातील नेत्यांची फिल्डिंग?

सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे कर्नाटकने एका मंत्र्याला गमावल्यामुळे राज्यातीलच अन्य एका नेत्याची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. गेल्या दोन-चार दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकांमुळे केंद्रीय मंत्रिमंडळात बदल किंवा विस्तार होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय पातळीवर सुरू आहे.

Related Stories

कर्नाटक: “माझे हात बांधलेले आहेत”; अतिक्रमणांवर महसूलमंत्र्यांचे वक्तव्य

Shankar_P

सवदी यांचे वक्तव्य कर्नाटकातील जनतेला खुश करण्यासाठी : उपमुख्यमंत्री अजित पवार

Shankar_P

कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्यातील चाचणीला बेंगळुरात प्रारंभ

Omkar B

वृंदावन गार्डन, रंगनथिट्टू अभयारण्य तीन दिवस बंद

Shankar_P

शासकीय विभाग ५० टक्के क्षमतेने कार्यरत राहतील

Shankar_P

म्हैसूर विद्यापीठाने विकसित केले जलद कोरोना चाचणी किट

triratna
error: Content is protected !!