तरुण भारत

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, मुंबईत शंभरी पार, नवे दर काय?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानुसार, आज पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 28 ते 29 पैशांनी वाढ झाली. डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 30 ते 31 पैशांनी वाढ झाली आहे. 

Advertisements
  • नांदेडमध्ये पेट्रोल 104.87 रुपये 


मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 102.58 रुपये तर डिझेल 94.70 रुपये इतके झाले आहे. पुणे शहरात पेट्रोल 102. 24 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.91 रुपये प्रति लिटर इतके आहे. वाहन इंधनाच्या किंमतीत महिन्याभरातील ही 25 वी वाढ आहे. तर नांदेडमध्ये पेट्रोल 104.87 रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी 95 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत.


दिल्लीत पेट्रोल 96.41 रुपये तर डिझेल 87.28 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 97.69 रुपये तर डिझेल 91.92 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 96.34 रुपये तर डिझेल 90.12 रुपये इतके वाढले आहे.


राजस्थानमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 102. 73 रुपये मोजावे लागत आहे. तर डिझेल 95.92 रुपये प्रति लिटर इतके आहे. पाटणामध्ये पेट्रोल 98.49 रुपये तर डिझेल 92.59 प्रति लिटर इतके आहे. तर रांचीमध्ये पेट्रोल 92.51 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.13 रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • दररोज 6 वाजता किमती बदलतात


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात

Related Stories

महामार्गालगत मिळणार नाही मद्य

Patil_p

इंधन भडका; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

Rohan_P

आभास झा यांच्यावर वर्ल्ड बँकेने सोपवली मोठी जबाबदारी; वाचा सविस्तर…

datta jadhav

नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसाठी मे महिन्यात निवडणुका

datta jadhav

वुहानमधील कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर

prashant_c

बंगालला स्वतःची मुलगी हवी, आत्या नको

Amit Kulkarni
error: Content is protected !!