तरुण भारत

आंबोलीत 26 पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

वार्ताहर /आंबोली

आंबोलीत रविवारी पर्यटनासाठी आलेल्या 26 पर्यटकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार दत्तात्रय देसाई आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. कारवाईत सातत्य राखणार असल्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी सांगितले.

Advertisements

आंबोलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटन बंद आहे. तरीही घाटमाथ्यावरील व परराज्यांतील पर्यटक पर्यटनस्थळांवर गर्दी करताना दिसत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी आहे. परजिल्हा आणि परराज्यांतून आलेले पर्यटक कोरोनाचा संसर्ग वाढवू शकतात. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत 26 पर्यटकांवर कारवाई केल्याची माहिती हवालदार देसाई यांनी दिली. चौकुळ आणि गेळे येथेही पर्यटकांना फिरण्यास अटकाव केला आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटक आढळल्यास पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र चौकुळ आणि गेळे सरपंच आंबोली पोलीस दूरक्षेत्रात देणार असल्याचे सांगण्यात आले.

साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देसाई, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली, हवालदार सुनील भोगण, पोलीस नाईक दीपक शिंदे, कॉन्स्टेबल अविनाश कांबळे, कॉन्स्टेबल राजेश नाईक यांनी ही कारवाई केली.

Related Stories

निवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांचा सत्कार

Patil_p

देवराज अर्स कॉलनीतील बुडाच्या भूखंडांचा लिलाव

Patil_p

वन टच फाऊंडेशनकडून दुर्गम भागात मदत

Patil_p

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार काम करा

Patil_p

शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंगाला शंकराची आरास

Patil_p

जायचे होते कोप्पळला… पोहोचले बेळगावात!

Amit Kulkarni
error: Content is protected !!