तरुण भारत

चव्हाट गल्ली सेवाकेंद्रात नागरिकांची लूट

असंघटित कामगारांकडून अतिरिक्त शुल्कवसुली : जाब विचारताच केले पैसे परत

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर असंघटित कामगारांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत मिळविण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यासाठी नागरिकांकडून भरमसाट पैसे वसूल करण्यात येत आहेत.

चव्हाट गल्ली येथील सेवा केंद्रात हा प्रकार उघडकीस आला असून सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी आवाज उठवून या प्रकाराला विरोध केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, बाळू नाईक, भास्कर चव्हाण, वामन शहापूरकर, सागर नावगेकर आदींनी सेवा केंद्रात जाऊन संबंधितांना जाब विचारला.

सरकारी आर्थिक मदत मिळविण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका अर्जाला शंभर रुपयांहून अधिक रक्कम मागितली जात आहे. खरे तर ही मदत मिळविण्यासाठी आधारकार्ड, पासबुक आदी कागदपत्रांची गरज आहे. यासाठी सरकारतर्फे दहा रुपये अधिकृत शुल्क ठरविण्यात आले आहे.

सुनील जाधव व त्यांच्या सहकाऱयांनी संबंधितांना जाब विचारला. ‘आपण या योजनेसंबंधी अधिकाऱयांकडे चौकशी केली आहे. तुम्ही जास्तीचे पैसे का घेत आहात?’ असा प्रश्न विचारताच सेवा केंद्राबाहेर थांबलेल्या काही नागरिकांना संबंधितांनी पैसे परत केल्याची घटनाही घडली.

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी असंघटित कामगारांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत मिळवून देण्यासाठी सेवा केंद्रात एजंटराज सुरू झाले असून सरकारने या सेवा केंद्रांवरील कारभारावर लक्ष ठेवण्याची मागणी केली जात आहे.

Related Stories

सुभाषचंद्र बोस यांची विचारसरणी सर्वांना मार्गदर्शक

Amit Kulkarni

शिवसेनेतर्फे बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली

Patil_p

लोकमान्य सोसायटीतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांना एन -९५ मास्कचे वितरण

Rohan_P

वंटमुरी कॉलनीत घरे बांधून द्या

Patil_p

शहापूर येथे पावसाचे पाणी दुकानात शिरून नुकसान

Amit Kulkarni

डॉ. कुरणी यांना एनसीसी उपमहानिर्देशकांचे प्रशंसापत्र

Omkar B
error: Content is protected !!