तरुण भारत

दोनपेक्षा अधिक बाधित असल्यास घर सीलडाऊन

महापालिका आयुक्तांचा आदेश

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असली तरी शनिवारी शहराच्या दक्षिण भागातील जवळपास 13 घरे सीलडाऊन करण्यात आली. एका घरात दोनपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण असतील तर ते घर सीलडाऊन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

यापूर्वी नियमानुसार एका इमारतीमध्ये पाच जण किंवा त्याहून अधिक पॉझिटिव्ह आढळत असतील तर संबंधित इमारत मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून सील केली जात होती. मात्र, महानगरपालिका आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार शनिवारी शहराच्या दक्षिण भागातील भवानीनगर, चन्नम्मानगर, कावेरीनगर, भाग्यनगर, सोमवार पेठ, गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड, आगरकर रोड परिसरात दोनपेक्षा अधिक कोरोनाबाधित असलेल्यांची घरे सीलडाऊन करण्यात आली.

आगरकर रोड येथे एकाच अपार्टमेंटमध्ये जवळपास 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्य अधिकाऱयांनी संबंधित अपार्टमेंटला तात्काळ भेट देऊन अपार्टमेंटमधील सर्व सदस्यांची तपासणी केली आहे. बेळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कंटेन्मेंट झोन तयार करून कोरोना आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

Related Stories

अवघे बेळगाव ‘सायलेंट मोड’वर

Amit Kulkarni

नमोंच्या नेतृत्वात देश प्रगतीकडे

Amit Kulkarni

प्रवासी घटले… परिवहनला फटका

tarunbharat

शहरात उन्हाचा तडाखा

Patil_p

जोयडा तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी 15 कोटी 79 लाख रुपये मंजूर

Amit Kulkarni

बेळगावसह पाच जिल्हय़ांत आजपासून लसीची ‘ड्राय रन’

Patil_p
error: Content is protected !!