तरुण भारत

…अन् अंगाला चिकटताहेत लोखंडी वस्तू

कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर घडला प्रकार, बेळगाव शहरात चर्चा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर लोखंडी वस्तू चिकटत असल्याच्या घटना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घडल्या आहेत. रविवारी बेळगावमध्येही कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगाला चावी, चमचे, इतर धातूच्या वस्तू चिकटत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर याची शहरभर चर्चा रंगली
होती.

गुड्सशेड रोड येथील 52 वर्षीय दौलत पाटील यांच्या शरीराला या वस्तू चिकटत असल्याचे दिसून आले. त्यांनी नुकताच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. महाराष्ट्रात असे प्रकार घडल्याने आपणही करून पहावे या उद्देशाने त्यानी हा प्रयोग केला. त्यावेळी चावी, स्टीलची प्लेट यासह इतर धातूचे साहित्य त्यांच्या अंगाला चिकटण्यास सुरूवात झाली. हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

‘त्या’ प्रकाराचा लसीशी काहीही संबंध नाही

डॉ. अमित भाते (एमडी), वैद्यकीय संचालक जीवन रेखा हॉस्पिटल. व्हॅक्सिनमुळे शरीरामध्ये चुंबकत्व निर्माण होते, याला वैद्यकीय किंवा वैज्ञानिक आधार नाही. व्हॅक्सिन म्हणजेच लस या पूर्णतः सुरक्षित असून त्यामध्ये कोणताही धातूजन्य घटक नाही. विषाणूमधील स्पाईक प्रोटीन व अँटिजेन पूर्णतः निष्क्रीय केलेले असतात. विषाणू डीएनए व आरएनए यांच्या संयोगातून बनलेला असतो. व्हॅक्सिन तयार करताना त्यातील आरएनए घटक पूर्णपणे काढला जातो. त्यामुळे व्हॅक्सिनमध्ये कोणताही धातूजन्य घटक शिल्लक राहत नाही. शरीरात चुंबकत्व निर्माण होण्याचे दुसरेच कारण असू शकते, पण लसीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. अशा व्यक्तीची वैद्यकीय तपासणी व काही चाचण्या करणे अधिक श्रेयस्कर ठरेल.

Related Stories

शेतकऱयांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱयांनी घेतली बैठक

Patil_p

मोटार सायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

sachin_m

मनपाने केली भाडेतत्वावर देण्यात येणारी वाहने जप्त

tarunbharat

बेंगळूर: बीबीएमपी आयुक्तांनी कोरोना जबाबदाऱ्यांबाबत केएएस अधिकाऱ्यांना दिली माहिती

triratna

लसीकरणास चालना देण्यासाठी लोकमान्य आरोग्य सन्मान योजनेस प्रारंभ

Amit Kulkarni

तलावात बुडून अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!