तरुण भारत

खंजर गल्ली येथे जुगारी अड्डय़ावर छापा

18 जुगाऱयांना अटक, 1 लाख 33 हजार रुपये, 18 मोबाईल जप्त ; एफआयआर दाखल

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी बेळगावसह संपूर्ण जिल्हय़ात लॉकडाऊन जारी असतानाच जुगारी अड्डेही फोफावले आहेत. शनिवारी मध्यरात्री कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी खंजर गल्ली येथील जुगारी अड्डय़ावर छापा टाकून 18 जुगाऱयांना अटक केली आहे.

सर्व 18 जणांवर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळून 1 लाख 33 हजार रुपये रोख रक्कम, 18 मोबाईल संच, एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

खंजर गल्ली परिसरात मटका, जुगार जोरात चालतो. अमली पदार्थांच्या व्यवसायाविरुद्ध स्थानिक नागरिकांनीच आवाज उठविला होता. त्यामुळे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी यापूर्वीही येथील अड्डय़ांवर अनेक वेळा छापे टाकून कारवाई केली आहे. गांजा व पन्नी विकणाऱयांवरही कारवाई झाली आहे.

शनिवारी मध्यरात्री मोठय़ा प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांनी या अड्डय़ावर स्वतः छापा टाकून 18 जुगाऱयांना अटक केली. त्यांना मार्केट पोलीस स्थानकात नेण्यात आले. कोरोना थोपविण्यासाठी सरकारने मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर आदी नियम लागू केले आहेत. या नियमांची पायमल्ली करून जुगार बसविण्यात आला होता.

जुबेर शकील सुभेदार, अरिफ जिलानी कोतवाल, अय्याज बाबू खतीब, अब्दुलसलाम मैबूसाब बाळेकुंद्री, सोहेल अख्तर मुल्ला, शरीफ दस्तगीरसाब मुल्ला, अबुतालिब गौस शेख, असीफ युसुफखान सय्यद, अयुबखान करीमखान पठाण, वासीम अयुब सौदागर, इम्रान अब्दुलरहीम पटेल, वासीम शब्बीरअहमद अळवाडकर, मुश्ताफ शफी ताशिलदार, इक्बाल दस्तगीरसाब नरेगल, फिरोज अयुबखान पठाण, रफिक महंमदशफी ताशिलदार, सलीम अब्दुलखतीब, शाह नासीर पठाण सर्व रा. खंजर गल्ली अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱयांची नावे आहेत.

Related Stories

वैश्यवाणी समाजाचा समावेश गॅझेटमध्ये करा

Amit Kulkarni

बळ्ळारी : कर्नाटक-आंध्र सीमेचे सीमांकन २ महिन्यांत पूर्ण होणार

Shankar_P

स्मार्ट सिटीची कामे करण्यास विलंब झाल्याने शहरात अनेक समस्या

Amit Kulkarni

मागण्यांसाठी विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Amit Kulkarni

नागरिकांकडून कोविड-19 ची मार्गदर्शकप्रणाली पायदळी

Omkar B

रविवारी जिल्हय़ात 372 कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni
error: Content is protected !!