तरुण भारत

सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट साडेसात टक्क्यांवर

प्रतिनिधी/सांगली

जिल्हÎात दोन महिन्यानंतर प्रथमच पॉझिटिव्हिटीचा रेट हा साडेसात टक्क्यांवर आला आहे. ही  जिल्हÎासाठी आनंदवार्ता आहे.  जिल्हÎात रविवारी नवे 812 रूग्ण आढळून आले आहेत. तर 878 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असणाऱया 20 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचारात आठ हजार 951 रूग्ण आहेत. जिल्हÎात वाळवा तालुक्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे, याठिकाणी रविवारी 188 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

Advertisements

 मनपाक्षेत्रात 118 रूग्ण

महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या चांगलीच आता आटोक्यात  येत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 118 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात रूग्णसंख्या कमी झाली होती. त्यामध्ये रविवारी थोडीशी वाढ झाली आहे.  सांगली शहरात 94 तर मिरज शहरात 24 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 29 हजार 520 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 89 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.

वाळवा तालुक्यातील रूग्णसंख्या आटोक्यात नाही

ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक कमी झाला आहे. पण, वाळवा तालुक्यात मात्र रूग्णसंख्या अद्यापही कमी होताना दिसून येत नाही वाळवा तालुक्यात रविवारी 188 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हÎाचा पॉझिटिव्हिटीचा दर चढता  आहे. जिल्हÎातील इतर सर्व तालुक्यात आता फक्त दुहेरी रूग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे हा जिल्हÎाला फार मोठा दिलासा आहे.  आटपाडी तालुक्यात अवघे 30 रूग्ण वाढले आहेत. तर कडेगाव तालुक्यात 55 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 30 तर पलूस तालुक्यात 84 रूग्ण वाढले आहेत.  तासगाव तालुक्यात 20 तर जत तालुक्यात 50 रूग्ण वाढले. कवठेमहांकाळ तालुक्यात 42, मिरज तालुक्यात 110 रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात 85 रूग्ण वाढले आहेत. तर वाळवा तालुक्यात 188 रूग्ण वाढले आहे.

20 जणांचा मृत्यू

जिल्हÎात 20 जणांचे मृत्यू झाले आहेत. महापालिका क्षेत्रात  तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरात दोन मिरज  शहरातील एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  आटपाडी तालुक्यात तीन तर  कडेगाव तालुक्यात  एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात एकाचा तर तासगाव तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.  कवठेमहांकाळ तालुक्यात एकाचा,  मिरज तालुक्यातग्न पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

878 रूग्णांची कोरोनावर मात

जिल्हÎात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 878 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्हÎात एक लाख 30 हजार 201 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील एक लाख 17 हजार 512 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रूग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हÎाला दिलासा मिळाला आहे.

नवे रूग्ण    812

उपचारात    8951

बरे झालेले   111715

एकूण      130201

मृत्यू        3738

रविवारचे बाधित रूग्ण

तालुका       रूग्ण  

आटपाडी     30

कडेगाव       55

खानापूर       30

पलूस         84

तासगाव       20

जत          50

कवठेमहांकाळ    42

मिरज         110

शिराळा       85

वाळवा        188

सांगली शहर    94

मिरज शहर     24

एकूण         812

लसीकरण

आजचे         305

एकूण         741166

कोरोना चाचणी –  10526

Related Stories

सांगली : कोरोना संकटापुढे विरोधकांना शिक्षक बँकेच्या सत्तेचे डोहाळे

triratna

सांगली : उद्योजक संघटनांनी कोविड सेंटर्स उभारण्यावर भर द्यावा – जिल्हाधिकारी

triratna

सिगारेटसाठी परप्रांतीयांचा राडा, चारचाकी जाळली, तीन दुचाकी फोडल्या

triratna

पाण्यासाठी शिवसेनेचे बुधगाव येथे आंदोलन

triratna

महाराष्ट्राच्या मनगटात ताकद, दिल्ली पुढे झुकणार नाही 

triratna

वीज उद्योग तीन लाख, तीस हजार कोटींच्या तोटय़ात, खासगी कंपन्यासाठी 16 वीजनिर्मीती केंद्रे बंद : कॉ.मोहन शर्मा

triratna
error: Content is protected !!