तरुण भारत

Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतचा आजपर्यंतचा फिल्मी प्रवास फक्त एका क्लिकवर


मुंबई \ ऑनलाईन टीम

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. १४ जून २०२० मध्ये सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतचे असे अकाली जाणे चाहत्यांना चटका लावून गेले. सुशांतच्या पहिल्या मृत्यूदिनी त्यांचा चित्रपट करिअरचा प्रवास उलगडणारी एक वेबसाईट लॉंच करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून चाहत्यांना त्याच्याविषयी प्रत्येक लहान मोठी गोष्ट फक्त एका क्लिकवर जाणून घेता येणार आहे. या वेबसाइटचे नाव www.ImmortalSushant.com असे आहे.|

या वेबसाईटमध्ये काय असणार आहे ?

या वेबसाईटवर सुशांतने आतापर्यंत केलेले सर्व सिनेमे, मालिका हा त्याचा आजपर्यंतचा प्रवास याविषयी जाणून घेता येणार आहे तेही एका क्लिकवर. सुशांतने आजपर्यंत मिळवलेले पुरस्कार, त्याच्या मुलाखती तसेच त्याचे विविध फोटो या सगळ्या गोष्टी आपल्याला या वेबसाईटच्या माध्यमातून एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. त्याच्याविषय़ी असलेले सोशल मीडियावरील विविध ट्रेंड तसेच त्याची स्वप्न, सुशांतची सिनेमाविषयी असलेली आवड, त्याने त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेले आजवरचे कष्ट तसेच आपण समाजाला काही तरी देणे लागतो या भावनेतून त्याने केलेले मदत कार्य असेल, हा त्याचा आजवरचा प्रवास या माध्यमातून पाहता येणार आहे किंवा उलगडला जाणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी खर तर ही एक चांगलीच गोष्ट आहे कारण या वेबसाईटच्या माध्यमातून त्याची प्रत्येक आठवण जपता येणार आहे.

सुशांत सिंहच्या संपूर्ण परिवाराची परवानगी घेऊनच ही वेबसाइट सुशांतच्या मृत्यूदिन लाँच करण्यात आली आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी हे जग सोडून जाणे ही गोष्ट कोणालाच पटली आहे.

Related Stories

शरद पवारांवर उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

triratna

शहरात १८, ग्रामीणमध्ये १७ नवे रुग्ण

triratna

भारतात घुसखोरी करणार्‍या पाच जणांना बीएसएफच्या जवानांनी केलं ठार

triratna

राष्ट्रपती भवन ६ फेब्रुवारीपासून नागरिकांसाठी पुन्हा खुले

triratna

फलटण तहसील कार्यालयही नाही सुरक्षित

Patil_p

स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेवरून पवारांना गोवण्याचा प्रयत्न दुर्दैवी – डॉ. अमोल कोल्हे

triratna
error: Content is protected !!