तरुण भारत

बिहारमध्ये राजकीय भूकंप; चिराग पासवान काकांच्या भेटीला

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूंकप झाला आहे. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचा भाऊ मुख्यमंत्री नितीश कुमारांना जाऊन मिळाल्याने लोकजनशक्ती पार्टीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे चिराग पासवान या एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. सहापैकी पाच खासदार काका पशुपती पारस यांच्याकडे गेल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर चिराग पासवान काकांची भेट घेण्यासाठी घरी गेले आहेत. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत.

चिराग पासवान यांच्याकडे लोक जनशक्ती पार्टीची सूत्रं आल्यापासून पाचही खासदार नाराज होते. बिहार विधानसभा निवडणूक जदयू आणि भाजपसोबत न लढत स्वतंत्र लढण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतल्यानं खासदारांच्या नाराजीत आणखी भर पडली होती. तेव्हापासूनच लोक जनशक्ती पार्टी फूट पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली होती.

खासदार पशुपती पारस यांच्या नेतृत्वामध्ये पक्षातील अन्य चार खासदारही पक्षापासून वेगळे होण्याची तयारी करत आहेत. हे सर्व खासदार जेडीयूच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. पशुपती पारस यांचे नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते जेडीयूमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

Advertisements

चिराग पासवान यांच्यावर नाराज असलेल्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं असल्याचं वृत्त आहे. पाचही खासदार पक्षांतर करण्याच्या वाटेवर असून, असं झाल्यास लोक जनशक्ती पार्टीला मोठा धक्का बसणार आहे. 

Related Stories

दिल्लीत जगातील सर्वात मोठे कोरोना सेंटर

Patil_p

मायावतींकडून पुन्हा ब्राह्मणकार्ड

Patil_p

महाराष्ट्राचे GST चे २४ हजार ३६० कोटी रुपये मिळावे ; अजित पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

Abhijeet Shinde

नीलकुरिंजीने बहरले शालोम हिल्स

Patil_p

राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तोंडावर अयोध्येत कोरोनाची धडक!

Rohan_P

इस्लामपूरच्या २४ बाय ७ पाणीयोजनेचा पाठपुरावा करु : पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!