तरुण भारत

ताजमहाल 16 जूनपासून पर्यटकांसाठी खुला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे 16 एप्रिलपासून बंद असलेला ताजमहाल 16 जूनला पर्यटकांसाठी खुला केला जाईल. ताजमहालसह संरक्षित स्मारके उघडण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाद्वारे अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

Advertisements

मागील वर्षीही ताजमहाल, आग्रा फोर्ट, फतेहपूर सिकरीसह देशभरातील केंद्र संरक्षित स्मारके कोरोना संसर्गामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर 207 दिवस उघडलेल्या ताजमहालचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. गेल्या वर्षी ताजमहाल 18 दिवस पर्यटकांसाठी बंद होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ताजमहाल 15 जूनपर्यंत बंद करण्याचे आदेश होते. जेव्हा अनलॉकिंग प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा पर्यटनाशी संबंधित लोकांनी ताजमहाल आणि इतर स्मारके उघडण्याची मागणी केली होती, जेणेकरून लोकांना रोजगार मिळू शकेल. त्यानंतर ताजमहालसह संरक्षित स्मारके उघडण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाद्वारे अधिसूचना जारी करण्यात आली.

Related Stories

देशात 2.59 लाख नवे बाधित

datta jadhav

उत्तर भारतातील थंडीची लाट कायम

Patil_p

दिल्लीत 3,036 नवे कोरोना रुग्ण; 45 मृत्यू

pradnya p

दिल्लीत कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला 4 लाखांचा टप्पा

pradnya p

मेरठमध्ये गंभीर परिस्थिती : म्युकरमायकोसिसचे 24 नवे रुग्ण तर एकाच मृत्यू

pradnya p

राजकीय पक्षांनी कलंकितांना उमेदवारी नाकारावी

Patil_p
error: Content is protected !!