तरुण भारत

अभिनेता रितेश देशमुखकडून राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा!

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. यामध्ये नेतेमंडळी, कार्यकर्ते, समर्थकांसह सिनेकलाकारांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देखमुख याने देखील राज यांच्यासोबतचा एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला त्याने एक कॅप्शन देखील दिले आहे. 

Advertisements


रितेश आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे की, ‘माय मराठीवर जीवापाड प्रेम करणारे, मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचा सदैव विचार करणारे, युवकांचे प्रेरणा स्थान आणि माझे मित्र राज ठाकरे जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना’, असे म्हणत एक खास फोटो देखील शेअर केला आहे.


दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (14 जून) 53 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने  त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी दरवर्षी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये,’ अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली आहे. 

Related Stories

बॉलीवुड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक; कारण …

pradnya p

जॅकलीन झाली ‘हंटर रानी’

Amit Kulkarni

पॅरिस हिल्टनला मिळाला नवा जोडीदार

Patil_p

‘एबी आणि सीडी’ होणार ऑनलाईन प्रदर्शित

Patil_p

‘रिंकू राजगुरू दाखवणार आठवा रंग प्रेमाचा

Patil_p

संगीतकार नदीम – श्रवण जोडीतील श्रवण राठोड रुग्णालयात दाखल; प्रकृती गंभीर

pradnya p
error: Content is protected !!