तरुण भारत

तिलारीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार – गोपाळ गवस

दोडामार्ग / वार्ताहर-

तिलारी नदीपात्रात साचलेला गाळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र हा गाळ काढण्यास यांत्रिकी विभाग वेळकाढूपणा करत आहे. परिणामी पावसाळ्यात  नदीला पूर आल्यास हे पाणी लगत असणाऱ्या गावात शिरून धोका निर्माण होतो. यंदादेखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास यास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील असे शिवसेना जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस यांनी सांगितले. तसेच या आशयाचे एक निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देणार असल्याचेही श्री. गवस यांनी स्पष्ट केले.

Advertisements


यावेळी गोपाळ गवस पुढे म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीला गेल्या दोन वर्षापासून पावसात मोठ्या प्रमाणात पाणी येते व आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात हानी होते‌. मुळातच या नदीवर तिलारी धरणाचे पाणी सोडले जाते, तसेच पावसाचे पाणी, नदी, नाले यांचे पाणी तसेच चंदगड येथील धामणे धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पावसामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने गावात तसेच वस्ती व घरांमध्ये पाणी शिरते, असे असतानाही प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते. तिलारी नदीचा गाळ काढणे करिता यांत्रिक विभाग अलोरा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, तिलारी पाटबंधारे प्रकल्प यांची जबाबदारी होती. या भागातील लोकांना प्रशासनाने या गाळ काढण्याच्या कामात चालढकल केल्यामुळे हा त्रास होणार आहे.  तसेच याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लवकरच सादर करणार असल्याचेही गवस यांनी सांगितले. 

Related Stories

रत्नागिरी शहरात समावेशासाठी काही ग्रामपंचायतींचा होकार

Patil_p

निसर्ग वादळाचा संगमेश्वरलाही तडाखा

Patil_p

रानबांबुळी रस्ता ठरतोय जीवघेणा

NIKHIL_N

मंगळवारी तब्बल 56 एसटी दाखल!

Patil_p

मराठीतील ज्येष्ठ कवी, संपादक सतीश काळसेकर यांचे निधन

Ganeshprasad Gogate

आंतरजातीय विवाहितांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतिक्षा निकाली

triratna
error: Content is protected !!