तरुण भारत

”मोदींनी जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी”

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

युनाटेड किंगडम येथे G-7’ परिषद रविवार दि. 11 ते 13 जून दरम्यान पार पडली. या परिषदेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. या परिषदेला संबोधीत करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हा दहशतवाद, अधिकारवाद आणि आर्थिक जुलूम या विरोधात ‘G-7’ राष्ट्रांचा एक नैसर्गिक सहकारी आहे, असे प्रतिपादन केले होते. याच मुद्यावरुन काँग्रसचे वरीष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींनी जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

चिदंबरम यांनी असे म्हटले की, आउटरीच बैठकीत देशाचे पंतप्रधान हे एकमेव असे पंतप्रधान आहेत ज्यांना या परिषदेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळाली नाही ही फार खेदाची बाब आहे. यावर स्वत: त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. कारण ज्या विषयावर ते जगाला संबोधित करत आहेत. त्यालाच मोदी तिलांजली देत आहेत. असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.

‘ओपन सोसायटीज अ‍ॅण्ड ओपन इकॉनॉमिज’ सत्रात मोदींनी लोकशाही, वैचारिक स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य याविषयी भारताच्या सभ्य प्रतिबद्धतेवर भर देत उपस्थितांना संबोधीत केले होते. पंतप्रधानांनी या सत्राला दूरसंवाद माध्यमाद्वारे संबोधित केले होते.

Advertisements

Related Stories

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या : मुख्यमंत्री

prashant_c

वाईत बाधिताची नैराश्येतून आत्महत्या

Patil_p

पंतप्रधान मोदींकडून डॉक्टर्सची प्रशंसा

Amit Kulkarni

जम्मू काश्मीर : महबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत आणखी तीन महिने वाढ

pradnya p

औषधांच्या काळाबाजारावर राज्यांनी कठोर कारवाई करावी

Patil_p

सातारा जिल्ह्यात 38 बाधित , 2 बळी

triratna
error: Content is protected !!